चेतक हत्तीमारे
दखल न्यूज भारत
भंडारा :- भारतीय आयुर्विमा क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठणारी साकोली येथील पुजा कुरंजेकर एल आय सी साकोली शाखेत चेयरमन क्लब मेंबर व सी एल आय असून यांनी १५ जून २०२२ ते ३० जुलै २०२२ या कालावधीत ऑल इंडिया स्तरांवर प्रतिनीधी भरती स्पर्धेत अवध्या दीड महिन्याच्या कालावधीत एल आय सी मध्येत १९ प्रतिनिधींची भरती केली आहे. आज त्याचे ४० प्रतिनिधी कार्यरत आहेत यामध्ये साकोली शाखेतून त्यांचा सत्कार सोमनाथ (गुजरात) येथे दिपक चंद्रेल रिजनल मॅनेजर सी एल आय, राधिका अल्शी रिजनल मॅनेजर सी एल आय यांच्या हस्ते १५ सप्टेंबर २०२२ पुजा कुरंजेकर यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यक्रमात एल आय सी चे गौरव मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल साकोली जीवन विमा क्षेत्रातील सर्व जनतेकडून व भारतीय आयुर्विमा महामंडळ नागपूर विभागाकडून पुजा कुरंजेकर हिच्या या कार्यकुशलतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.