निरा नरसिंहपुर दिनांक 27

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार

     इंदापूर तालुक्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 50 कोटी 15 लाख रुपये मिळालेल्या विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ वार बुधवार दिनांक 28/ 9 /20 22 रोजी संपन्न होणार संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे व माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. पुणे सोलापूर जिल्ह्याची हद्द जोडणारा निर्णय गाव येथील निरा नदीवरील पूल बांधणे 13 कोटी 50 लाख रुपये,, गोंदी ओझरे -गिरवी -ठोकळे वस्ती रस्ता 12 कोटी35 लाख,, कचरवाडी बावडा रस्ता 1 कोटी 30 लाख,, पिठेवाडी बावडा रस्ता 1 कोटी 50 लाख रुपये, तसेच गिरवी, पिठेवाडी, निमगाव, कचरवाडी, रुई, डाळज नंबर एक, येथील 5 कोटी50 लाख रुपये, या सर्वच कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, माजी सभापती प्रवीण माने, प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, अभिजीत तांबिले, श्रीमंत ढोले, सचिन सपकाळ, नवनाथ रुपनवर, हनुमंत बंडगर, बापूराव शेंडे, दत्तात्रेय घोगरे, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर, यांच्यासहित सर्व कार्यकर्ते व डाळच नंबर एक रुई लाखेवाडी गिरवी पिठेवाडी कचरेवाडी व इतर सर्व तालुक्यातील सर्वच सरपंच उपसरपंच व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार व शेवटी या सर्व कार्यक्रमाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ झाल्यानंतर 4 वाजून 30 मिनिटांनी निरनिमगाव या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com