सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
संजय गांधी निराधार अशासकीय समितीची बैठक दि. 27/08/2024 रोजी तहसील कार्यालय सभागृह येथे पार पडली बैठीकाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील गड्डमवार होते.
या बैठकी मध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 57, श्रावणबाळ सेवानिवृती वेतन योजने अंतर्गत 49, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निराधार योजना 49, इंदिरा गांधी विधवा योजना 51, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना अंतर्गत 4 अश्या एकूण 210 लाभार्थी पात्र करण्यात आले.
असून सदर बैठकीला यावेळी समितीचे सदस्य,सावली तालुका महामंत्री तथा भाजपा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजपा सावली शहराध्यक्ष आशीष कार्लेकर, गेवरा खुर्द येथील उपसरपंच डॉ.गंगाधरजी धारने,व्याहाड बुज येथील पतरुजी गेडाम, सावली नप चे नगरसेविका सौ. शारदाताई गुरनुले,उसेगाव येथील माजी उपसरपंच अरून पाल यांची तसेच तहसीलदार चिरडे मॅडम, नगरपंचातचे प्रतिनिधि दुधबळे मॅडम , गटविकास अधिकारी तेलकापल्लीवार हे उपस्थित होते.