सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतीनिधी
तहसील कार्यालय सावली तहसिलदार सावली यांचे आस्थापनेवर नायब तहसिलदार संवर्गाची एकुण 3 पदे मंजुर आहेत परंतु सावली तालुक्यात आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात श्रावण बाळ निराधार योजना संजय गांधी निराधार योजना, व इतर योजना राबवीत असतांना तसेच कामकाज करीत असतांना सावली तालुक्यातील संजय गांधी योजनेकरीता 1 नायब तहसिलदाराचे पद निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
नायब तहसिलदार संगायो पद नसल्याने कामकाजात बिल तपासण्यास तहसिलदार यांना व्यक्तीशा प्रत्येक वेळी लक्ष घालावे लागते. त्यामुळे अतीरीक्त भार येत असल्याने सदर योजनेचे नियंत्रण व्यवस्थापन व नियोजन करण्यास अडचण निर्माण होते. त्या करिता इतर तालुक्याप्रमाणे सावली तालुक्याला संगायो नायब तहसिलदार पद निर्माण करण्याबाबत शासनास संजय निराधार गांधी अशासकीय समितीची तर्फे मागणी करण्यात आली.
या वेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटिल गड्डमवार, सदस्य सतिश बोम्मावार, शारदा गुरनुले, अरुण पाल, पत्रु गेडाम, डॉ. धारणे उपस्थित होते.