श्रीकृष्ण प्रतिष्ठाणची दहीहंडी शिवसत्ता ग्रुपनी फोडली..

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदीत श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपाल काला आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपाला सह गोंविदाचा उत्साहा शिगेला पोहोचला होता. तसेच वरूण राज्याच्या आगमनाने वातावरण अल्हाददायक झाले होते.

           आळंदी शहरातील माऊली मंदिर परिसरात श्रीकृष्ण प्रतिष्ठान आयोजित आळंदीतील मानाची दहीहंडी उभारण्यात आली होती. या दहिहंडी उत्सवाला आणि हंडीला आळंदी शहरातील मुख्यत्वे करून तीन गोविंदा पथकांनी सलामी दिली. रात्री नऊ वाजता हि दहीहंडी माजी उपनगराध्यक्ष आदित्यराजे घुंडरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसत्ता ग्रुपच्या गोविंदा पथकानी फोडली.

           यावेळी सर्व पथकातील गोविंदानी तसेच नागरीकांनी मोठी गर्दी करून गोविंदा आलारे आला गोकुळात आनंद झाला या व इतर गितावर आणि डि जे च्या तालावर ठेका धरला होता. तसेच उत्सव काळात आळंदीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

           या दहीहंडी निमित्त प्रसिद्ध गाडामालक संतोषशेठ मांडेकर यांचा प्रसिद्ध गाड्याच्या बैलाचा लक्ष्या चा विशेष सत्कार करत मानचिन्ह देण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, संजय घुंडरे, आकाश जोशी, गणेश गरुड, सुनील घुंडरे, उपसरपंच रवींद्र कुऱ्हाडे, संकेत वाघमारे, ज्ञानेश्वर बनसोडे आयोजक वासुदेव तुर्की, अक्षय कुऱ्हाडे, वेद लोंढे, सचिन सोळंकर, सागर प्रसादे, चैतन्य लवंगे, गौरव तुर्की, शंतनू पोफळे, अनिकेत पासलकर उपस्थित होते.