
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान – पारशिवनी तालुकृयातील कांद्री वार्ड क्रमांक १,हरीहर नगर येथे वेकोली डंम्पिंगच्या खदानीमुळे सहा वर्षाच्या मुलीसह बापाचा घरात दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे .
मागील काही महिन्यांपासून वेकोली डब्लुसीएल अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे मनमानी डंम्पिंग खदान अंतर्गत कन्हान परिसरात सुरु आहे.
त्यामुळे या परिसरात मोठमोठ्या टेकड्या निर्माण झाल्या असून रोज सकाळी-दुपारी-संध्याकाळी तीन वेळा तिव्र गतिची दगाण होत असल्याने नागरिकांच्या घरांना मोठे नुकसान होत आहे.
या डम्पिंगच्या धुळीमुळे व धमाक्यामुळे नागरिकांचे स्वास्थ्य खराब झाले आहे,जिवे जाणे शुरू झाले आहे.
या बाबत विविध संघटने द्वारे अनेकदा तक्रार नोंदविल्या नंतर सुद्धा वेकोलि डब्लुसीएल च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज दुपारी ०१:३० वाजता च्या दरम्यान पारशिवनी तालुक्यातील कांद्री गावातील वार्ड न.१ हरीहर नगर येथे डंम्पिंगच्या दगाणीमुळे एक घर कोसळुन सहा वर्षाची मुलगी कुमारी यादवी कमलेश कोटेकर आणि पिता कमलेश गजानन कोटेकर यांचा घर पडुन मातीत दबल्याने दुर्देवी मृत्यु झाला.
घटने नंतर परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.परिस्थिती चिघडू नये म्हणूध घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
वेकोली अधिकारी व कंपनी संचालक यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येवू लागली आहे.
याचबरोबर कुटूंबियांना त्वरित आर्थिक मदत होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांचे आहे.