
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
युवासेना जिल्हा सरचिटणीस प्रतिक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त उपराई येथील जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रतिक राऊत त्यांनी आपला वाढदिवस लहान गरजू विद्यार्थ्यांसोबत भेटवस्तू देऊन साजरा केला यावेळी उपयोगी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोरडे,शेकोकार उपस्थित होते त्यानंतर उपराई येथे हिंदू स्मशानभूमी येथे तिसव्या वाढदिवसानिमित्त 30 झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी युवा सेना जिल्हा सरचिटणीस प्रतीक पाटील राऊत मंगेश सोनोने,अजय राऊत, गणेश गोसावी,योगेश कुकटकर आदी उपस्थित होते. त्यानंतर दर्यापूर येथील ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना तालुका समन्वयक बबनरावजी विल्हेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक विश्वभर मार्के, युवा सेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, शिवसेनेचे उपशहर प्रमुख निलेश पारडे,उप तालुकाप्रमुख पंकज रेखे,दत्ता विल्हेकर अनिलभाऊ साबळे युवा सेना शहर प्रमुख रोहित बायस्कर आशिष लायडे, नितीन माहुरे,भरत गावंडे, अनिकेत रहाटे, पंकज पाचपोहे मनोज लोखंडे,शिलवंत रायबोले(पत्रकार)यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.