— हे जीवन सुंदर आहे……
— माणसाचा जन्म नेहमी नेहमी थोडाच येणार आहे…….
— आलो जन्माला तर घ्या मजेत जगून……
स्वतः दुःखविरहित जगण्यासाठी इतरांच्या अज्ञानाचा थोडासा लाभ उठवीला आणि मला सुखी जीवन जगता आलं, तर यात काय वावगे आहे…..?
आणि मी जर त्यासाठी मिळविलेल्या शैक्षणिक पदव्यांचा,त्यातून मिळविलेल्या चाणक्य कौशल्याचा थोडासा वापर केलाच,आणि त्यातून मला छोटा,मोठा लाभ मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे…….?
समुद्रातून एक लोटा पाणि काढून घेतलं तर समुद्र आटणार आहे का….?
क्षनैक मोहाला मी थोडासा जर बळी पडलो तर काय दुःखाचा डोंगर कोसळणार आहे का…..?
कोसळलाच तर पाहुन घेऊ पुढचं पुढं……!
हे जिरवायची एवढी ताकत नाही काय आपल्यात….
मग माझ्या माणूस बनण्याचा उपयोग तो काय…..?
ही संधी जर मला मिळालेली असेल तर तीचा मी पुरेपूर लाभ का नाही उठवायचा…..?
हेच तर खरं शहाणपण होय.!
दुसऱ्याची त्याच्या अज्ञानामुळे,हतबलतेमुळे आणि विशेष म्हणजे माझ्यावर त्याच्या असणाऱ्या पूर्ण विश्वासामुळे सर्व प्रकारची संपत्ती हडपण्याची अशी संधी चालून आली तर मी त्या संधीचे सोने नाही केले,तर माझ्यासारखा मूर्ख माणूस कुणी असूच शकत नाही..
नितिमत्ता,इमानदारी,तत्वज्ञानाच्या गोष्टी,या केवळ जिभेपर्यंतच ठीक आहेत,त्यांना घशाच्या खाली उतरू द्यायच्या नाहीत.त्या जर घशातून हृदयात जर घुसल्या तर आपलं काही खरं नाही……!
हे जे पृथ्वीतलावर महापुरुष,तत्ववेत्ते होऊन गेलेत ना, त्यांनी मला ( माझ्यासारख्या जनतेला ) सुखी करण्यासाठी प्रयत्न केलेत.त्यांच्या क्रांतीचा लाभ मी लाभ नाही घेतला,तर त्यांचा अपमान झाल्यासारखे होईल…..!
बरं त्यांनी केलेल्या त्यांच्या क्रांतीच्या बदल्यात त्यांचे आम्ही पुतळे,स्मारक उभारून त्यांच्या जयंतीला,स्मृतिदिनाला पुष्पहार चढवून अभिवादन करून जिभेवरून भाषण ठोकतोच की……..
अजून काय पाहिजे त्यांना….?
या देशात प्रत्येकांनी अपापल्या पत्नी व लेकरांसाठी येनकेन प्रकारे, स्वार्थासाठी संघर्ष करत,कूटनितीचा आधार घेत जगलो तर कुणीही कुणावर उपकार करण्याची गरजच पडणार नाही. आणि हा मार्ग तर सगळ्यांसाठी संविधानाने खुला केला आहेच की …..!
आणि राजकारण्यांच्या नादी लागून जर आपला स्वार्थ साधत असेल,आपल्याकडून झालेल्या गुन्ह्यातून त्यांच्याकडून अभय मिळत असेल तर,या लोकशाहीत विभूतीपूजेला मी जीवनध्येय मानले तर बिघडलं कुठं….?
त्यासाठी नसलेल्या देवाचे भांडवल करून लोकांच्या अज्ञान आणि हतबलतेचा लाभ कायमस्वरूपी उठविण्यासाठी भगवी वस्त्रे घालून, दाढी वाढवून, पुजारी बनून ( ओव्हरलोड वेट ) सर्वच प्रकारचे क्षनैक मोह मिळत असतील तर,मी चालून आलेल्या संधीला धुडकावणे म्हणजे, त्या संधीचा अपमान करणे नव्हे काय….?
अशा वरील प्रकारच्या विचार आणि आचार शैलीमुळे जीवनात दुःखे कायमचे निर्माण झालीत….
म्हणून यावर पृथ्वीतलावर कुठेच उपाय नाहीत……
असेच जग निर्माण झाल्यामुळे जनावरं माणसं झालीत….
आणि माणसं जनावरं झाली.
हे होऊ नये म्हणूनच तर शिक्षणाची क्रांती म.फुलेनी केली परंतू,त्या शिक्षणातून असे बहुतेक असुर निर्माण झाल्यामुळे ( काही अपवाद असतीलही ) याच महापुरुषांच्या क्रांतीला काळिमा फासण्यात आम्हीच सर्वात पुढे आहोत……!
म्हणूनच येणारा काळ जर बदलायचा असेल तर बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन याची जबाबदारी घेऊन संविधाणातून जागृत होऊन कृतीतून सिद्ध होण्यासाठी पुढे आले पाहिजे……
मी येणार,”आपण,……?