समाजसेवक दिलीप तांदळे,” महाराष्ट्र रत्न,पुरस्कारांनी सन्मानीत.. — मराठी अभिनेत्री कोमल सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.. — पुरस्कार स्त्रिभूषण रमाई आंबेडकर यांना समर्पित.. — पुणे येथे थाटात पार पडला महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा… — आमदार विकास ठाकरे सह एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले भरभरून कौतुक..

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

         समाजसेवक दिलीप तांदळे हे महाराष्ट्र राज्यातील नामांकित व्यक्तीत्व.अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाज सेवेची कर्तव्य पार पाडली व पाडत आहेत.

          विदर्भातील(नागपूर)अशा कर्तव्यदक्ष व कर्तव्यक्षम व्यक्तीमत्वाला पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंगळवार पेठ येथे नुकतेच,मराठी अभिनेत्री कोमल सावंत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते,”महाराष्ट्र रत्न, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी असलेले दिलीप तांदळे यांनी सदर,”महाराष्ट्र रत्न पुरस्कार, स्त्रिभूषण रमाई आंबेडकर यांना समर्पित केला आहे.

 

        श्री.दिलीप तांदळे हे स्त्रिभुषण रमाई आंबेडकर संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत तर बौद्ध एकत्रीकरण व सेवा सक्षमीकरण संस्थेचे(पुणे) विदर्भ अध्यक्ष आहेत.

       तद्वतच ते म.न.पा.स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेचे अध्यक्ष असून दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया रनी.अॅडीटर म्हणून काम पाहतात.

      याचबरोबर समता सैनिक दल मध्ये कार्यरत असून एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारतचे महाराष्ट्र राज्य संघटक आहेत.

         अनुभवी समाजसेवक दिलीप तांदळे हे विविध संघटने मध्ये कार्यरत आहेत.त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..

         सिनेआर्क प्रोडक्शनस् आणी रुद्रान्श फाऊंडेशन चे मॅनेजिंग डायरेक्टर व सी.ई.ओ. विनोद खैरे,नागपूर मुंबई यांच्या विद्यमानाने दरवर्षी आयोजित, प्रायोजित “महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. १५ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,पेठ, पुणे येथे संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वत्र आदरास पात्र असणारे, प्रेरणास्त्रोत ज्यांचा आपल्या संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा अशा निस्वार्थ,अभूतपूर्व काम करणाऱ्या १०१ मान्यवर सत्कारमूर्तीना,व्याक्तीमत्वांना मानाच्या महाराष्ट्र रत्न २०२४ “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

      यावेळी मुख्य अतिथि ज्ञानेधर मोहोळ माजी अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर पालिका, पुणे युनूस पठाण, विद्यमान उपआयुक्त पुणे महानगर पालिका,पुणे अॅड.सी. शैलजाताई ज्ञानेश्वर मोहोळ वक्ता, लेखिका, संपादिका पुणे शहरच्या शुभ हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्काराने स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्राने गौरवण्यात आले. याप्रसंगी १०१ मान्यवर सत्कारमूर्तीचा ” महाराष्ट्र रत्न पुरस्काराने” यथोचित सम्मान करण्यात आला. यावेळी, सिनेआर्क प्रोडक्शनस् आणी कास्टिंग स्टुडीओ चे मॅनेजिंग डायरेक्टर व सी.ई.ओ. विनोद खैरे, यांनी असे सांगितले की “महाराष्ट्र रत्न पुरस्काराचा” उद्देश फक्त एवढाच कि विविध कार्यक्षेत्रातील निस्वार्थ लोकांनी एकत्र सिनेआर्क प्रोडक्शनस् कृत “महाराष्ट्र रत्न” च्या छत्रा खाली यावे,एकमेकास मदत करावी.

        कोण्या एखाद्या व्यक्तीस,समाजास, गरजवंतांना सर्वोतोपरी शक्य असेल ती सर्व मदत करावी, शक्य तितक्या लोकांना योग्य रोजगार,व्यवसाय प्रशिक्षण,शालेय व उच्चशिक्षण, समाजात ओळख व त्यांच्यामुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी,समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी जे जे शक्य असेल ते ते सर्व आपण एकत्रितपणे करण्या साठीच हा उपक्रम राबविला जातोय. सिनेआर्क प्रॉडक्शनस् आणी कास्टिंग स्टुडीओ अंधेरी, मुंबई मागील अनेक वर्षापासून मनोरंजन क्षेत्रात चित्रपट निर्मिती, टी. व्ही जाहिरात,वेब सिरीजच्या प्री आणी पोस्ट प्रोडक्शन मध्ये असून लवकरच विदर्भातील नागपूर शहरात त्याच्या स्वन्त्र कार्यालय,अभिनय प्रशिक्षण अकॅडमी सुरु करीत आहेत व तेथेच त्यांच्या आगामी मराठी आणी हिंदी वेब सिरीज,शॉर्ट फिल्म्स, चे चित्रीकरण सुद्धा करणार आहेत.

        सिनेआर्क प्रोडक्शनम् आणी कास्टिंग स्टुडीओ चे स्वतःचे प्लॅटफॉर्म (ईअनफ्लिक) नावाने या वर्षी येतोय त्यामुळे सिनेआर्क प्रोडक्शनस् च्या होम प्रोडक्शन मध्ये विदर्भातील बहुतांश नवीन कलाकारांना अभिनयाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण, एडिटिंग, सिनेमटोग्राफी प्रशिक्षण घेऊन (ईअनफ्लिक) वर त्यांची कला सादर करण्यास योग्य मंच मिळेल तसेच त्याचे लघुपट वेब सिरीज विविध विषयावरील व्हिडिओ ईअन प्लिक्स जगभरात प्रक्षेपित करून त्याच्यातील सुप्त कलागुणांची कदर व त्याची कला योग्यरीत्या सादर करण्याकरिता त्यांना इतर कोणावर विसंबून राहावे लागणार नाही असेही म्हणालेत. 

       याप्रसंगी 101 सत्कारमूर्ती मान्यवरांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.