के. सी. सी.सिमेंट रोड बांधकाम कंपनी च्या हलगर्जीपणामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान… 

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर 

       चिमूर – वरोरा रोड चे बांधकाम खूप दिवसापासून सुरू असून सिमेंट रोड च्या पाणी जाण्यासाठी पुल तयार केले गेले असून त्यावरून पाणी न जाता ते पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभे पीक असताना त्या मधून जात आहे. नवेगाव पुनर्वसन गावापासून ते सोनेगाव जंगलातील पाणी येऊन नाल्याद्वारे ते ताडोबा जंगलात जात आहे.

     ऐन पावसाळ्यात के.सी.सी कंपनी ने रोड चे काम तसेच रोडवरील पुलांचे काम पूर्ण करणे आवश्यक होते.परंतु रोड बाधकाम करीत असताना शेतकऱ्यांचे शेतीला लागून असलेले पाणी जाण्याचे पाठ बंधारे हे कामामुळे मुरूम, रेती, गिट्टी, सिमेंट, जाऊन ते बुजून खोली कमी होऊन पाठबंधाऱ्याचे पाणी सरळ न जाता ते थेट शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात शिरून पुर उभ्या पिकांचे नुकसान करीत आहे.

           खडसंगी परिसरात खूप शेतकऱ्याचे नुकसान होत असून याकडे शासनाने प्रशासन लक्ष देऊन पाठबंधारे खोल करून देण्याची मागणी खडसंगी परिसरातील शेतकरी करीत आहे.