पुन्हा एकदा पालक जनतेची जिल्हा परिषद शाळांनाच प्रथम पसंती… — उच्च दर्जाचे शिक्षण म्हणजेच शासकीय जिल्हा परिषद शाळेतील नियमांचा वसा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : “माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेतच जातो” हे अभिमानाने सांगणारे पालकांचा ओघ आताही शासकीय जिल्हा परिषद शाळेतच मुलांचा प्रवेश निश्चित करतांना दिसत आहेत. कारण शासकीय शाळांमध्ये जी मुलभूत सुविधा व योजनांचा लाभ मिळतो ते फक्त जिल्हा परिषद शाळेतच. म्हणूनच शहरातील नंबर १ ठरलेली आणि १८६० पूर्वीची स्थापना असलेली एकमेव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ. शाळा क्र ०१ ( सेमी इंग्लिश ) गणेश वार्ड साकोली या शाळेत आता मुलांची पटसंख्या पावणे तीनशे वर गेली आहे. 

      जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं १ गणेश वार्ड साकोली येथे १ ते ७ वर्ग असून काही वर्षांपूर्वी या शाळेच्या ढासळती स्थितीवर कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींचे लक्ष नव्हते. पण अचानक तीन वर्षांपूर्वी येथे “एक्टीव्ह स्टॉफ” रूजू झाला. यात मुख्याध्यापक डि. डि. वलथरे, एम. व्ही. बोकडे, चेतन बोरकर, टि. आय. पटले, बलवीर राऊत, शालिनी राऊत आणि यांसमवेत सेवा शिक्षक कार्तिक साखरे, आरती कापगते यांनी या शाळेची शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने रूपच पालटून ठेवले. आणि आता या शाळेला नुकतेच चित्ररेखा इंगळे या नव्या शिक्षिकेचा उपहार विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

           या शासकीय टॉप वन सेमी इंग्लिश शाळेत विशेष म्हणजे “शारीरिक एक्टीव्हीटी” चेतन बोरकर व शालिनी राऊत हे मुलांच्या शिक्षणासोबतच शारीरिक व्यायाम आणि मैदानी खेळ यातून मुलांना “एक्टीव्ह बॉय & गर्ल्स” तयार करतात. मुलांना अभ्यासासाठी वारंवार न रागविता प्रेमाच्या शिकविणीतून आपलेसे करून लाडीगोडीने विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाचे भूत टाकणारे दांडगा अनुभवाचे शिक्षक एम. व्ही. बोकडे व बलविर राऊत यांच्या या अनोख्या स्टाईलला पण शाळा व्यवस्थापन समितीने मानाचा मुजरा ठोकला आहे.

             तर शाळेची पहिली घंटा झाली की शिस्त कशी असते यावर सर्व मुलामुलींना प्रार्थना सत्रात विविध जनरल नॉलेज बाबद माहिती देत त्याची विद्यार्थ्यांने नोंद करून ती अंमलात आणण्यासाठी येथील टि. आय. पटले सर यांना तेवढेही मुलं घाबरतातही मात्र यांचा आदेशाचे पालन करतांना विद्यार्थीही तेवढे आनंदात असतात.

          याचबरोबर येथील सर्वांचे बॉस समजले जाणारे मुख्याध्यापक डि. डि. वलथरे यांच्या “कडक डिसीप्लीन” वर चांगले चांगले हादरतात. कारण यांच्या कडक शिस्तीमुळेच आज ही जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं १ शाळा नंबर १ ठरलेली आहे. 

   आता १ जुलैला शाळेचे नविन सत्र सुरू होणार आहे. मात्र येथील शिक्षकांनी ८ दिवसांपूर्वीच शाळेतील पूर्वतयारीवर वारंवार शाळेत जाऊन संचालन व सुव्यवस्था कशी राहील यावर शाळा व्यवस्थापन समितीसह शाळेत भेट देत यांचे संपूर्ण नियोजन आखले गेले आहे.

         आता आहे फक्त वाट मुलांच्या शैक्षणिक आनंदाची व येत्या सोमवारी १ जुलैला या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ शाळा क्रं १ सेमी इंग्लिश गणेश वार्ड या शाळेतील पहिल्या “टण..टण..टण” घंटेची…!