आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन… — तहसीलदार हनुमंत जगताप यांच्या अध्यक्षेत बैठक सपन्न.

 

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत आगामी आषाढी एकादशी व बकर ईद निमित्ताने होणाऱ्या धार्मिक उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन सर्व स्तरावरील तालुका प्रशासनाने केले आहे.

         ईद व आषाढी एकादशी निमित्त तालुका प्रशासनाची बैठक तहसीलदार हनुमंत जगताप तहसील कार्यालय पारशिवनी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. 

       या प्रसंगी तहसीलदार,सुभाष जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पारशीवनी यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पारशिवनी येथील सभागृहात शांतता बैठक पार पडली.बैठकी मध्ये आगामी सण उत्सव संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

         पारशिवनी तालुक्यातील व पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील गावात व शहरात आषाढी एकादशी व बकर ईद निमित्ताने होणाऱ्या धार्मिक उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे व उत्सवात कोणत्याही परिस्थितीत धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या तालुक्यातील नागरिकांना विनंती पुर्वक सुचना करण्यात आल्या आहेत.

      अफवा फसरवण्याचा कोणी ही प्रयत्न करू नये.तसे आढळून आल्यास पोलीस कारवाई केली जाईल असे यावेळी ठाणेदार राहूल सोनवणे यांनी सांगितले. तसेच आज बुधवारी सायंकाळी पोलीस स्टेशन पारशिवणी येथे बकरी ईद आणि आषाढी एकादशी निमित्ताने पारशिवनी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करिता रूट मार्च अंतर्गत सुरक्षा रंगीत तालीम घेण्यात आली.

        रूट मार्च पोलीस स्टेशन ते ज्वेलर्स मार्केट,दर्गा मस्जिद,गांधी चौक,बँक ऑफ इंडिया चौक या भागात घेण्यात आला.सदर रंगीत तालीम दरम्यान ढाल, हेल्मेट,रायफल,स्टेचर,मेगा फोन,पो.स्टे.चे वाहनासह दोन अधिकारी,11अंमलदार,15 होम गार्ड हजर होते.