
डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
धनंजय वंजारी हे गोंदिया जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात व एका सामान्य परिवारात जन्म झाला.
त्यांचे सुरूवातीचे जीवन अतिशय कठीण प्रसंगातून गेले आहे.त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ला कालेज जवळ असलेल्या कॅम्पसच्या वस्तीगृहात राहून पूर्ण केले.
वंजारी साहेब यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतलेल्या परिक्षेत IRS या संविधानिक,मानाची व संविधानिक पावर असलेली जागा प्राप्त करून ते आयकर भवन नागपूर येथे सहायक आयुक्त पदी रूजू झाले.ते एवढ्या मोठ्या मानाच्या व सत्ता असलेल्या पदी असतांना त्यांच्या मनाला थोडासा ही अहंकार स्पर्स झाला नाही.
वंजारी साहेब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान समतावादी व राष्ट्रवादी विचाराने प्रेरित होऊन सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.तसेच त्यांच्या उज्ज्वल व यशस्वी जीवनाचे महान तत्वज्ञान त्यांना त्यांच्या आईच्या संघर्षमय जीवनातून प्राप्त झाले आहे असे दिसून येते.
वंजारी साहेब यांच्या आयकर भवन नागपूर येथे सहायक आयुक्त पदी रूजू होताच भ्रष्टाचारि अधिकारी, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गोळा करणारे भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट अभियंता, कार्यकारी अभियंता , उपअभियंता , भ्रष्ट उच्चस्थ अधिकारी, भ्रष्ट जंगल वनपरिक्षेत्राधिकारी, सहायक उपवनसंरक्षक, उपवनसंरक्षक , गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयातील आरोग्य विभागात चालू असलेल्या भ्रष्टाचारी व देशाचा कर डूबवून व भ्रष्टाचार करून देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या भ्रष्ट वृत्तीच्या लोकांमध्ये धाक निर्माण झाला आहे.
या समाजाभिमुख, समतावादी, कर्तृत्ववान , मनमिळाऊ, प्रामाणिक,व सचोटीबध्द अधिकारी वंजारी साहेब यांच्या हातून घडत असलेल्या महान कार्याचा गौरव डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे केंद्रीय संघटक संविधान पर्यावरण व जंगल संरक्षण संघटना गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली आयकर भवन नागपूर येथे भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी चौधरी साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अजय चव्हाण, नागपूर, आकाश सहारे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदि मान्यवर उपस्थित होते.