प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी..

प्रितम जनबंधु

संपादक 

        संभाजीनगर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पैठण तालुका कार्यकारिणीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची नुकतीच जयंती साजरी करण्यात आली.

       यावेळी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवकार्यावर प्रकाश टाकला.

        राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचे राज्य निर्माण करून बहुजन समाजाला आरक्षण देऊन त्यांचे कल्याण व उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्न केले. बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले.

        याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे राज्य सरचिटणीस दशरथ आडसूळ, पैठण तालुका अध्यक्ष व्ही. एन खंडागळे, पत्रकार सोमनाथ शिंदे, पत्रकार बाबासाहेब गायकवाड, संजय खडसन, प्रकाश निकाळजे, माऊली बावणे, राहुल गिरहे, राजू चाबुकस्वार, आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.