पशुपालकामध्ये पसरले भीतीचे वातावरण
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वनविभागाला
प्रसिद्धी पत्रकातून जनतेनी केली मागणी .
दिनेश बनकर कार्यकारी संपादक
दखल नुज भारत 7822082216
आरमोरी
तालुक्यातील गणेशपूर {कोजबी } येथे राऊत
यांच्या शेतात फार्महाऊस आहे. त्या फार्महाऊस
मध्ये शेताची रात्र व दिवसाच्या सुमारास रखवाली
करण्याकरिता पाळीव कुत्रा ठेवला होता. हा कुत्रा
रात्रीच्या सुमारास नेहमी प्रमाणे फार्महाऊस मधील
दरवाज्याजवळ बांधलेला असायचा परंतु
सोमवारला रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्या
पाळीव कुत्र्यावर्ती ताव मारून त्या कुत्र्याला
अक्षरश फरपळत नेऊन त्याला ठार केले यामुळे
शेतमालकावर्ती फार मोठी समस्या निर्माण
झाल्याचे दिसून येत आहे .सदर फार्महाऊस हा
कोजबी गावाला लागून असून फार्महाऊस लगत
झुडपी जंगल सुद्धा असल्याने गावातील पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाल्याचे दिसून येत आहे .फार्महाऊस असलेल्या
परिसरातील एका शेतकऱ्यांचे दोन ते तीन
महिन्यांपूर्वी दोन जनावरे बिबट्याने ठार केल्याचे
सांगण्यात येत आहे .
वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त
करावा अशी मागणी कोजबी गणेशपूर येथील
पशुपालक यांनी प्रसिद्धी पत्रकातून वन विभागाकडे
केली आहे .
