नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

भंडारा-महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे जिल्हा परिषदेकडे 8 कोटी रूपयाचे बिल अडले असल्यामुळें ऐन पावसाळ्यात एमईसिबी अंतर्गत स्ट्रिट लाईट बंद करण्यात आली होती. त्यामुळे गत पंधरा ते विस दिवसांपासून, जिल्ह्यातील सर्वच गावे अंधकारमय झाली होती. गावातील रस्त्यांना अंधार राहत राहत असल्यामुळें ग्रामस्थांकडून गावकारभाऱ्यांना (सरपंच) अनेक प्रकारचे बोलने ऐकून घ्यावे लागत होते.

     दरम्यान आज दि. 28 फेब्रुवारी 2022 रोज मंगळवारला जिल्हा परिषदेत बैंठक असल्याचे पाहून जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेत गेले असता, जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी सरपंचांच्या समस्या जाणून घेत सरपंचांना घेऊन, सभागृह गाठत सभागृहात समस्येचे कथन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुन, एम.ई.सी.बी. चे नाईक यांना विचारणा केली असता, 8 कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याची माहिती प्राप्त झाली असता, जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा परिषदेकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे 40 लाख रूपये भरून जिल्ह्यातील संपुर्ण गावातील स्ट्रिट लाईट जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

      जिल्हा परिषद प्रियंक बोरकर यांनी केलेल्या मध्यस्थीतून अंधकारमय गावे प्रकाशमय होत असल्यामुळे उपस्थित सरपंच संघटनेचे शिष्ठमंडळ व सरपंच यांनी जि.प. सदस्य प्रियंक बोरकर यांचे आभार मानले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com