अकोट:-
आज दिनांक २८ जून रोजी न्याय मंदिर अकोट येथे बालकांचा मोफत व अनिवार्य शैक्षणिक हक्क कायदा २००९ विषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
सदर कार्यक्रमाला चकोर बाविस्कर (जिल्हा न्यायाधीश -१), बी.एन चिकणे (दिवाणी न्यायाधीश व.स्तर), वि.वि चौहान (सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर), व्ही.एम रेडकर (२ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर), राजकुमार गांधी(अध्यक्ष वकील मंडळ),राहुल वानखडे (सचिव विधिज्ञ मंडळ) न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,
न्याय मंदिर अकोट येथे बालकांच्या मोफत व अनिवार्य शैक्षणिक कायदा -२००९ विषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये वक्ते नंदकिशोर पंजाबराव हिंगणकर यांनी उपस्थित श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले, यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात चकोर बाविस्कर (जिल्हा न्यायाधीश-१) यांनी बालकांच्या मोफत व अनिवार्य शैक्षणिक कायद्याचे महत्व विषयी विमोचन केले,
सदर कार्यक्रमाला विधिज्ञ वर्ग,न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय जितकर (सामाजिक कार्यकर्ते) आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग,पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश देव (विधिज्ञ),प्रास्ताविक रतन पळसपगार (विधिज्ञ) तर आभार प्रदर्शन देवानंद फुसे (विधिज्ञ) यांनी केले,