ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा नगर पंचायती मधील लिपकाने 5000रु.ची लाच स्वीकारताना ACB च्या पथकाने पकडून कारवाई केली आहे.
तक्रारदाराच्या सीसी रोड व मंदिराचे सौंदर्यकरण कामाचे थर्ड पार्टी बिल मंजूर करून काढून देण्याचे कामाकरिता आरोपी देवीदास मुखरू देशमुख यांनी रुपये 5400/- लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये स्वीकारले. आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने स्वत: आरोपी यांनी पडताळणी नंतर रुपये 5400/- मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये स्वीकारल्याने नमुद आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर,
पर्यवेक्षण अधिकारी सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. गडचिरोली यांचे मार्गदर्शनात
श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक , सफौ /प्रमोद ढोरे, पोहवा/ नथ्थू धोटे, पो.ना. राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, पो.शी. संदीप उडान, चा.पो.हवा. तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली यांनी तपास कार्य पूर्ण करून
हैश वैल्यू घेण्यात आली.