पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे मंगळवार 28 /6/2022 रोजी वारजे माळवाडी येथील गोकुळ नगर पठार येथे जन जागृती म्हणून स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली.आपला परिसर आपली जबाबदारी म्हणून यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशन या शाळेच्या वतीने व नगरसेवक सचिन दोडके व, युवा नेते बाबू दोडके यांच्या सहकार्याने स्वच्छ, सुंदर व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी ही स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ओला – सुखा आपला कचरा वर्गीकरण करा ,, कचरा गाडीतच द्या, कुठे कचरा टाकू नये आपला परिसर स्वच्छ – सुंदर ठेवा उत्तम व निरोगी जीवन राहील अशी स्वच्छतेबाबत माहिती देत सर्व लहान मुलांच्या व नागरिकांच्या हातात स्वच्छतेचे माहितीपत्रक देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्ष व महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष ,,यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ निलम नारायण डोळसकर यांनी माहिती दिली.आणि स्वच्छता जनजागृती करण्यात आली,, रॅलीचे नियोजन,,संस्थापिका सौ.निलम नारायण डोळसकर ॲड. रामचंद्र कर्डिले, नारायण डोळसकर,व अश्विनी बेंद्रे,सोनवने, मोहिते, शिक्षिका शीतल पाटील, हर्षदा बदे, जयश्री कुंभार ,पालक गोपाल व्यंकटकर, अनिता थोरात ,जयश्री वाघमारे, प्रियंका गरड ,सोनाली कांबळे, आनंत अंबाड, हिना शेख, सरस्वती माने, लता दहिवाळ, रोहिणी शेळके, व पालक व नागरिक उपस्थित होते.