पुणे जिल्हा प्रतिनिधी
वारजे माळवाडी ते खडकवासला पर्यंत मिनि अटल बससेवा सुरू करण्यासाठी सरपंच सुभाष नाणेकर यांच्यावतीने पीएमपीएमलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे,डेपो मॅनेजर चंद्रकांत वरपे यांना देण्यात आले.या भागात जाण्यायेण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीचा कोणताही पर्याय नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खाजगी वाहतुकीचा वापर करावा लागत आहे.खाजगी वाहनांची भाडे स्वरूपातील मनमानी देखील नागरिकांना सहन करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बससेवेमुळे धरण परिसरातील नागरिकांना फायदा होईल.यावेळी उपस्थित सुभाष नाणेकर सरपंच, गणेश वांजळे उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा, सुनिल पायगुडे उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा खडकवासला हे उपस्थित होते.