प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी :– केंद्र शासनातर्फे नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे आरमोरी येथील भगतसिंग चौक येथे केंद्र सरकारच्या या योजनेचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने जाहीर केलेले अग्नीपथ योजना ही फसवी योजना असून भरमसाठ प्रमाणात वाढलेल्या बेरोजगार युवकांना भरकट ठेवण्यासाठी लागू करण्यात येत आहे. परंतु अनेक वर्षापासून सैन्य भरतीच्या प्रयत्नात असणारे जे युवक आहेत ज्यांचा नियमित सराव सुरू आहे, अशा युवकांना निराश करण्याचा काम केंद्र सरकारने केला आहे. लष्कराचे ध्येय उराशी बाळगून असणाऱ्या लाखो युवकांना कंत्राटी करण्याच्या खाईत ढकलणारी अग्निपथ योजना रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 17 ते 22 वर्षाच्या मुलांना चार वर्षासाठी लष्करात घेणार, मग चार वर्षांनी त्या मुलांनी करायचे काय ? उच्च शिक्षणाच्या वेळेवर मुलांना भरती करून घेणार,आणि मग चार वर्षांनी त्यांचं भविष्य वार्यावर सोडणार. तरुणांच्या भविष्यासाठी खेळ करणारे लस्करयांचे कंत्राटीकरण करणारी केंद्र सरकारची ही योजना विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी आहे. त्यामुळे आरमोरी येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला.
यावेळी उपस्थित आदिवासी सेल जिल्हा सचीव दिलीप घोड़ाम,तालुका कांग्रेस सचिव शशिकांत गेडाम, नगरसेवक मिलींद खोब्रागडे, प्रवीण रहाटे, रूपेश जवंजालकर, सूरज भोयर,अंकुश गाढवे, वैभव कुथे, रवी राऊत अतुल राऊत अतुल भोयर, मयूर खोब्रागडे, रमेश तोड़रे ,अनिकेत कुथे, अजय नारनवरे ,बाळकृष्ण चहांदे ,नेताजी गळे,रविन्द्र निम्बेकर, बबन जवंजालकर, मंगेश पाटील, सुनील कुमरे,गणेश पेटकुले, बबलू जवंजालकर,अनूप मानकर, जितेंद्र सोमकनकर, अभिजीत कोल्हे,राहुल हनवते, नितिन भोयर,खेमराज चाटाले, सूरज सोमनकर,पंकज सोमनकर अमित नेवारे कांग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उवास्तित होते.