ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – नुकताच मार्च 2024 च्या एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल घोषित झालेला असून श्यामानंद हायस्कूल महालगाव/ सुकडी चा निकाल उत्कृष्टरित्या लावुन विद्यालयातील यशस्वी परंपरा कायम राखली.
विद्यालयातील एकूण परीक्षेला 30 विद्यार्थी प्रविष्ट होऊन 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामध्ये प्रावीण्य श्रेणीमध्ये 2 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये 8 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये 15 तर तृतीय श्रेणीमध्ये 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातून प्रथम क्रमांक कु. पल्लवी राजकुमार सीडाम 80% द्वितीय कु अंजली राजकुमार गजभिये 78.40% तृतीय कु काजल रघुनाथ भालेकर 72.20% तीनही मुलींनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक के डी लांजेवार, एल सी रामटेके, के एन लांजेवार, एस बी मांडळकर ,कु. डी एल भुते ,अतुल गजापुरे, ज्ञानेश्वर बनकर, राजुभाऊ कापगते, संजय बागडकर तसेच पालक वर्ग यांनी केले.