डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
अहेरी तालुक्यातील येरमनार( टोला )येथील डोलु पेन्टा मडावी यांच्या घराला काल अचानक आग लागले असुन संपूर्ण घर आगीत जळून खाक झाली असून जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून खाक झाले आहेत.सदर बाब लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आज घटनास्थळी चारचाकी वाहन जात नसल्याने 2 कि.मी.अंतर पायी जात सदर कुटुंबाची भेट घेवून कुटुंबाला जीवनावश्यक वस्तु जसे तांदूळ,तेल,दाळ,साबण,कोलगेट,व कपड़े तसेच आर्थिक मदत केली असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला दिर देत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अडीअडचणी किंवा असे अचानक झालेल्या आघातवेळी सहकार्य करणे गरजेचे असल्याचं बोलले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती ,भास्कर तलांडे,लालसु आञाम माजी उपसभापती पं.स.भामरागड ,सुधाकर तिम्मा माजी संरपच तथा सदस्य ग्राम.मल्लेमपोडुर,किरणताई नैताम ग्रा.प.सरपंच पेरमल्ली,साजन गावडे माजी उपसरपंच ग्रा.प.पेरमली,विजय आञाम उपसरपंच ग्रा.प.येरमणार,दलसु आञाम उपसरपंच ग्रा. प.मेडपल्ली,लच्छु आञाम आ.स.संस्था उपसभापती ताडगाव,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी विनोद रामटेके,मल्ला तंलाडी लक्ष्मण कुळमेथे,प्रविण दुर्गे,हनमंतु दुर्गे,डोलु मडावी,सतिश तंलाडी,संदिप गावडे, सादु कुळमेथे,वारलु जोगी मडावी व कुटुंबातील सदस्य इरपे डोलु मडावी,प्रदीप मडावी,प्रशांत मडावी,सपना मडावीसह गावातील नागरिक उपस्थित होते.