
संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
ठरल्याप्रमाणे संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि नंतर समस्या,संदर्भ,आकलन,निष्ठा,कर्तव्य,सकारात्मक दृष्टिकोन,पुढील कार्ये,राजदंड,राष्ट्रीय कमळाचे फूल,राष्ट्रीय पक्षी मोर,व जनतेचा विकास यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातंर्गत भावनीक शब्दांची मांडणी,यापलीकडे दुसरे नाविन्यपूर्ण असे काही दिसले नाही.
तद्वतच महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म व महामहीम उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांना संसद भवनाच्या उद्घाटनाला का म्हणून बोलवण्यात आले नाही?या असमंजस पणातंर्गत शंकाजनक प्रश्न देशातील नागरिकांसमोर आहेत.
उद्घाटन प्रसंगी त्यांना बोलावण्यात आले नाही तर त्यांचा संदेश वाचून दाखविण्याचा औपचारिकपणा कशाला? आणि त्या मागिल उदेश काय? हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला खुलासेवार सांगितले पाहिजे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म व महामहीम उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या,”संसद भवन उद्घाटन प्रसंगी अनुपस्थिती बाबत, देशातील नागरिकांना सविस्तर माहिती देत नसतील तर त्यांना संसद भवन उद्घाटन प्रसंगी दूर का म्हणून ठेवण्यात आले? हे तरी देशातील जनते समोर त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आणून द्यायला हवे होते.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगाला अनुसरून देशातील नागरिकांमध्ये वैचारिक द्विधा व कर्तव्य द्विधा निर्माण करण्यात आली व ती का म्हणून करण्यात आली?हे प्रधानमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पुढे चालून माहागात पडू शकते असे चिन्हे आता दिसू लागली आहेत.
भारत देशातील नागरिक गुबाडे,मुर्ख,अज्ञानी,भावनिक आहेत असे समजून कृती अंतर्गत नेहमी दिशाभूल करणारी वर्तणूक करणे व भावनिक बोलून मोकळे होणे आता जमणार नाही हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी आणि त्यांना समर्थण देणाऱ्या खासदारांनी लक्षात घेतले पाहिजे.
लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात आणि इतर कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक रीत्या मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे जे बोलतात त्याच्या उलट कार्य करतात हा आजपर्यंतचा देशातील नागरिकांना आलेला अनुभव आहे.यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यावर देशातील नागरिक आता विश्वास ठेवायला तयार नाहीत.
प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचा मुद्दा असो की दरवर्षाला २ करोड सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याची हमी असो,शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचे व त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भावनीक साद असो, किंवा माहागाई कमी करण्याचा वचननामा असो,आणि इतर मुद्द्यांतंर्गत कुठल्याही प्रकारची नैतिक जबाबदारी असो,यावर भाजपा खरी उतरली नाही हे सत्य सर्वश्रुत आहे.
परत्वे ज्या संत महापुरुषांनी,”देशातील ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,मुस्लिम, मागासवर्गीय,विमुक्त भटक्या जाती जमाती,आणि सर्व नागरिकांच्या उत्थानासाठी,त्यांना शोषणातून मुक्त करण्यासाठी,त्यांच्यावरील अन्याय अत्याचार संपविण्यासाठी,त्यांना मानसन्मानाने जगता यावे यासाठी,त्यांना शासन-प्रशासनात समान भागीदारी मिळावी यासाठी,त्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी होता यावे यासाठी,आणि स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनुसरून जगता यावे यासाठी महान कार्ये केली त्या सर्व संत महापुरुषांची उपेक्षा करण्याचे काम भाजपा सत्तापक्षाची सरकारे व भाजपा पदाधिकारी करतात हे लपून राहिलेले नाही.
याचबरोबर गोरगरिबांचे मुले दर्जेदार शिक्षण घेवू नये म्हणून शिक्षण व्यवस्था महागाडी करणे व सातत्याने माहागाई वाढवून त्यांना आर्थिक कमजोर करणे,परावलंबी बनवीने यावर त्यांचा जोर आहे हे सुद्धा त्यांच्या कृतीतून उघड झाले आहे.
तद्वतच,जगप्रसिद्ध प्रकांड पंडित,महान समाजसुधारक,जगप्रसिद्ध महान अर्थतज्ज्ञ,वर्णव्यवस्थेच्या दास्यत्वातून मुक्त करणारा स्त्रीमुक्ती दाता व पुरुष मुक्तिदाता,देशातील सर्व नागरिकांना समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,न्याय, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगणारे थोर देशभक्त, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय प्रतिनिधीत्व याचे सर्व समाज घटकांबाबतचे अधिकारीक संबंध सांगणारे संविधान निर्माता,सर्वांना मताचा अधिकार मिळवून देणारे थोर देश विभूती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे काम भाजपा सरकारे करु लागली असल्याचे चित्र पुढे येवू लागली आहेत.
देशाची म्हणजे देशातील नागरिकांची सर्व प्रकारची मालमत्ता भांडवलदारांच्या घशात टाकणाऱ्या व टाकू इच्छिणाऱ्या भाजपा सरकारच्या कथनीत आणि करणीत जमीन आसमानचा फरक असल्याने या पक्षाचे केंद्र सरकार देशातील नागरिकांना सुखसमाधानाने जगू देईल असे वाटत नाही किंवा शांतीने राहू देईल यावर सुध्दा भरोसा ठेवता येत नाही.
ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात़र्गत लोककल्याणाच्या व लोकसुरक्षेच्या प्रगल्भ लोकशाहीची व केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्या परंम कर्तव्याची परिभाषा अधोरेखित केली आहे त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ब्र शब्द सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन करताना उच्चारला नाही,यावरुन ते कुठल्या दिशेने वाटचाल करीत आहेत व देशातील नागरिकांचे पुढे चालून काय हाल होणार आहेत? याबाबत सध्या तरी सांगणे कठीण आहे.
ज्या देशाच्या करंशीचे मुल्य वारंवार घटते आहे,ज्या देशातील नागरिकांवर केंद्र सरकारने दर डोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मागे लाखो रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे त्या के़द्र सरकारनी समतोल विकासाच्या बाता करणे म्हणजे कोलांट उड्या मारणे नव्हे काय?
“महामहिम राष्ट्रपती व महामहीम उपराष्ट्रपती यांच्या सन्मानार्थ,”विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांनी संसद भवन उद्घाटन प्रसंगी अनुपस्थितीत राहण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीला वाचविण्यासाठी व देशातील नागरिकांच्या हितासाठी,सुरक्षेसाठी सार्थकी लागणार काय?…हे पुढे चालून स्पष्ट होईल.
सर्व प्रथम कमळाच्या फुलाचा संबंध तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मासी व ज्ञानप्राप्तीसी जुळलेला आहे आणि भगव्या वस्त्रांचा संबंध तथागत भगवान गौतम बुद्ध व त्यांच्या भिख्खू संघाच्या चिवारातंर्गत येतो आहे हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
लोकशाही मध्ये राजदंडाला महत्त्व नसून लोका़च्या मताधिकाराला महत्व आहे.म्हणूनच या देशातील नागरिकच देशाचे सर्वोतोपरी मालक आहेत असा विचार प्रवाह देशातील नागरिकांत रुढ होणे आवश्यक आहे.