तो गतिरोधक धोकादायक,राजू झोडे यांच्या प्रयत्नांना यश.. — 26 तारखेपर्यंत प्रशासनाला दिला होता अल्टिमेटम..

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

               4 एप्रिल रोजी विसापूर टोल नाका परिसरात अवैधरित्या बांधण्यात आलेल्या गतिरोधकामुळे एका शिक्षिकेचा नाहक जीव गेला होता. टोल नाका व्यवस्थापकाच्या अशा दादागिरीमुळे अनेकाचे अपघात झाले होते. 

        मात्र कुणी आवाज उचलण्याची हिम्मत करीत नव्हते.मृतक शिक्षिकेचे पती डॉ.भीमरावजी जीवने यांनी उलगुलान संघठणेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्याकडे जाऊन न्याय मिळण्यासाठी दाद मागितली असता त्यांनी तीव्र आंदोलनाच्या इशारा देत प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता.

        प्रशासनाने त्वरित चौकशी करून टोल व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा केला.यावर प्रतिक्रिया देत डॉ. भीमराव जीवने यांनी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांचे आभार मानून म्रुत्तकास न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

         तर शहरात व्यवस्थापकाच्या दादागिरीमुळे त्रस्त झालेले लोकात आनंदाचे वातावरणरण निर्माण झाले.