युवराज डोंगरे/खल्लार
भोई व कुंभार हे समाज बांधव आपला उदरनिर्वाह आधीपासूनच गाढवाच्या सहाय्याने करीत असून गावातील छोटे-मोठे काम करून ते आपला प्रपंच चालवित आहेत मात्र इमानदारीने काम करणाऱ्या या समाज बांधवांना काही अधिकारी त्रास देत असल्याच्या घटना या खल्लार सर्कलमध्ये घडत आहेत.
दुसरीकडे ट्रक, ट्रॅक्टर असलेकी ते अधिकारी त्यांचा हप्ता वसूल करून बिनधास्तपणे चालू देतात शासनाच्या परवानगीनुसार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या समाज बांधवांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोकळीदारी करून दिली असतानाही काही महसूल अधिकारी त्यांना त्रास देत आहेत आधी मोठ्या प्रमाणात ट्रक ट्रॅक्टर ने होणारी वाळू चोरी बंद करा मगच या समाज बांधवांना त्रास द्या अन्यथा या अधिकाऱ्यांच्या विरोधात युवासेना मोठ आंदोलन उभारेल असा इशारा युवासेना विधानसभा समन्वयक प्रतीक राऊत यांनी दिला आहे.