
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बेरोजगारीच्या नावावर अवैध वाळू चोरीचा व्यवसाय चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केला जातो आहे.या गैर व्यवसायाकडे चिमूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात व भाजपासी संबंधित वाळू चोर असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
दिनांक २७ मार्च २०२५ रोज गुरुवारला मौजा हरणी – महादवाडी नदीच्या पात्रातून पहाटेच्या वेळी अवैध वाळू चोरुन नेणाऱ्या अनेक ट्रॅक्टरला दोन्ही गावच्या नागरिकांनी आणि महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांनी पकडले व चिमूर पोलीसांच्या स्वाधीन नऊ पैकी सहा ट्रॅक्टर केले होते.
ट्रॅक्टर चालक श्री.विजय पत्रु मेश्राम राहणार सावरगाव,श्री.अमोल खुशाल दडमल राहणार नेरी,श्री.नंदु कनीराम शेरकी राहणार वडाळा (पैकु),श्री.कैलास हरीदास नन्नावरे राहणार नेरी,श्री.विकल्प दिनकर नन्नावरे राहणार नेरी,श्री. मंदार जगदीश ढोणे राहणार नेरी,श्री.लखन संतोष श्रीरामे राहणार सोनेगाव,श्री.रतन क्षत्री मेश्राम राहणार सावरगाव,श्री.संदिप देवराव नन्नावरे राहणार नेरी हे सर्व रेती भरण्यासाठी हरणी घाटावर आले असता हरणी गाववासीयांनी त्यांना पकडले होते.
त्या सर्व वाळू चोरांवर चिमूर पोलिसांनी भरपूर दया दाखवत बिनकामाच्या भांदवी कलम BNSS 128 नुसार त्यांच्यावर कारवाई केली व पुढील कारवाईस तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे,असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांची हि सर्व ट्रॅक्टर असल्याने चिमूर पोलिसांनी बिनबुडाची थातूर मातुर कारवाई केली असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
भांदवी कलम 392 अंतर्गत वाळू व ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करण्याच्या पोलिसांच्या मनसुब्यावर कोणी पाणी फेरले हेच कळायला मार्ग नाही.
आता चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत कोणत्याही आरोपींवर गुन्हा दाखल न करता त्यांना अभय दिले तर बरे होणार नाही काय? हा प्रश्न जाणकार नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
वाळू चोरांना राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारी व कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी घाबरत असतील तर त्यांच्या पदाला काय महत्त्व?असा सुर जनतेमध्ये उमटण्याची दाट शक्यता आहे.