
धर्म हा देवासाठी,देवाच्या आरधनासाठी किंवा स्तुतीसाठी निर्माण झाला नसून तो मानवमुक्ती,मानव कल्ल्यान आणि मानवाच्या ,मुक्क्या प्राण्यांच्या,दीन दुबळा असमर्थ असहाय्य ,अपंग,वंचित,दुर्बल,अज्ञान,दुखितासाठी,निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी धर्माची उत्पत्ती झाली आहे.ते कसे ते पाहू या.
माणूस जेंव्हा रानटी अवस्थेत होता,जंगली जीवन जगत होता,जंगलात एकेकटा राहत होता,तेंव्हा तो फक्त स्वतःचाच विचार करीत असे.दोघेजण किंवा त्यापेक्षा जास्त जन एकत्र राहणे त्यास उमजत नसे,माहीत नव्हते,इतर जंगली प्राण्या प्रमाणे हिंस्र प्राणी म्हणजे वाघ सिंह लांडगा याना तो भित असे,हत्तीस पण भित असे,कारण हिंस्र प्राणी माणसाची शिकार करून त्यास खात असत,म्हणून त्यांची भीती निर्माण झाली,अजूनही आहे.हत्ती उंट बैल या सारखे बलवान पण माणसापेक्षा शक्तिमान होते,आहेत,पण ते हिंस्र नाहीत,म्हणून त्यांची भीती नसे,नाही.आणि ससा हरीण आणि पक्षी हे माणसापेक्षा दुर्बल असल्याने माणूस त्यांची शिकार करून भित्र्या पशू पक्षीना मारून आपले पोट भरतं असे,एव्हढेच नाही तर बलवान माणूस दुर्बल माणसास पण मारून खात असे.” बळी तो कान पिळी ” हा जंगली कायदा जंगलात राहणार्यांचा असे,अजूनही आहे,म्हणून ” अरे हा काय उद्दट जंगली माणूस आहे”. असे म्हणण्याची प्रथा किंवा बोलीभाषा आहे.
कालांतराने दुर्बल माणूस स्वसंरक्षणासाठी,स्वतःचा जीव सबळ प्राणी आणि सबळ माणूस याचे पासून वाचून घेण्यासाठी त्याने इतराचे सहकार्य घेणे,दोस्ती करणे,एकत्र राहणे अशी सुरुवात झाली.त्यानंतर जंगली माणसे टोळी करून राहायला लागले.जंगलात अशा अनेक टोळ्या निर्माण झाल्या.त्या टोळ्या फळे कंदमुळे , ससा,हरीण ,पक्षी यांची शिकार सामूहिकपणे करणे,फळे जमा करणे,ते साठवणे,शिकार साठवणे सुरू झाले.काही टोळ्या ऐतखाऊ स्वार्थी होत्या,त्यांनी कष्ट मेहनत न करता इतर टोळ्या वर आक्रमण करून त्यांचेकडे असलेले खाद्य घेऊन जात,सबळ टोळी ,दुर्बल तोलीस हरवत असे,असे हे स्वार्थी ऐतखाऊ शोषक टोळ्या आणि कष्टकरी श्रमिक टोळ्या निर्माण होऊन त्यांचेट युद्ध सुरू व्हायला लागले.प्रत्येक टोळीने जंगलांचा काही भाग स्वतःचा मालकीचा समजायला लागले.त्या जंगलात इतर कुणी आला तर त्यावर हल्ला करणे,किंवा त्यांचेपासून संरक्षणार्थ युद्ध करणे सुरू झाले.या टोळ्यांना घरे नव्हती.जंगलातील गुहा मध्ये राहायचे.जसे सिंह वाघ राहतात तसे.माणसे टोळी करून रहण्यामुळे हिंसरपासून पण संरक्षण होऊ लागले.त्यांना हे मारून पिटाळून लावायचे.
कालांतराने टोळ्यांच्या आक्रमणाची रीत बदलली.युद्धानंतर जे स्त्री पुरुष जिवंत राहायचे,त्या हरलेल्या टोळीतील स्त्री पुरुषांना सोबत घेऊन जायचे,ठेवायचे,त्यांना गुलाम म्हणून वापरायचे,त्यांचा युद्धासाठी उपयोग करायचे,आणि स्त्रियांचा सर्वांच्या संभोगाची इच्छा पूर्ण कर यासाठी आणि सेवेसाठी उपयोग करणे सुरू झाले.
थोडक्यात काय तर जंगली माणसाचे जंगली वागणे आणि जंगली कायदे आणि जंगली संस्कृती होती.हे इथे ध्यानात घेतले पाहिजे.
कालांतराने त्यांना भटके जीवन,आक्रमणे ,भांडणे ,मारामाऱ्या,लुटणे,पळापळी,शत्रुत्व याचे टेन्शन,शत्रुची कायम भीती,अमानुष हत्या याने ते त्रासून गेले,मानसिक त्रास व्हायला लागला.असे हे अस्थिर जीवन जगण्यापेक्षा स्थिर जीवन, शंतीमय,संरक्षित जीवन जगणे ही त्यांची गरज झाली.दरम्यान शेतीचा शोध लागला,स्त्रिया न भटकता एकच ठिकाणी राहून शेती करू लागल्या,पुरुष शिकार करून आनू लागले,अशा प्रकारे काही काळ जीवन जगले.” मुठभर पेरले तर पोटभर पिकते” हे त्यास कळल्यामुळे माणूस आता शिकार सोडून शेतीच करायला लागला.जंगलात झाडे तोडून जमीन कसायला लागला.त्या आधी नदी काठच्या सुपीक जमिनीवर शेती सुरू केली.शेती जिथे घर तिथे,सुरू झाले.स्त्रियांसाठी भांडणे मारामाऱ्या व्हायच्या त्याचा पण त्यांना त्रास व्हायला लागला.म्हणून त्यांनी ” कतुंब व्यवस्था ” निर्माण केली.अशा प्रकारे समाज व्यवस्थेची निर्मिती झाली.या नंतर धर्म निर्माण झाला,त्याची कारणे पुढील प्रमाणे.
1)अरब भूमीवर जेंव्हा टोळ्यांचा त्रास एकमेकास शिगेला पोहचला,जीवन जगणे कठीण झाले,दहशत आराजक,अशांती,खून खराबी या पासून सारे जन तंग झाले,तेंव्हा शांती ची गरज निर्माण झाली,म्हणून अमन ऑर शांती के लिये ” इस्लाम ” ची निर्मिती झाली. आल्लाको प्रसन्न करून घेण्यासाठी माणसे कपण्या ऐवजी बकरी कापण्याचा पर्याय काढला.आणि बकरी ईद सुरू झाली,असे म्हणतात. कुर्बान म्हणजे त्याग.देवासाठी माणसाची कुर्बानी नको,तर बेकारीची द्यावी,असे सुपीक डोक्यात विचार आले,आणि इस्लाम संस्कृतीत बदल झाला.एकंदरीत अमन शांती त्याग समृद्धी ( हिरवा रंग त्याचे प्रतीक ) ही तत्वे मूल्य विचाराने इस्लाम धर्म स्थिर झाला.त्यामुळे माणूस व त्याची अस्थिर परिस्थिती स्थिर झाली.
2 )ख्रिश्चन देशाच्या धार्मिक देशात पूर्वी यहुदी आणि ज्यू या दोन टोळ्या( जाती ) त भांडणे मारामाऱ्या हिंसा मोठ्या प्रमाणात व्हायची,ती थांबवण्यासाठी येशूने ” शेजाऱ्यावर प्रेम करण्याचा संदेश देत प्रचार केला.” याचाच पुढे धर्म बनला.याचा अर्थ शेजारी जेवल्या शिवाय आपण जेवायचे नाही.त्यांचेकडे काय आहे नाही याची चौकशी करायची,त्याच्या सुखदुःखात सामील व्हायचे,या हेतूने ख्रिचन धर्म निर्माण झाला.” अतिथी देवो भव, विश्वची हे माझे घर,वसुधैव कुटुंबकम,बंधुभाव हे तत्त्व घेऊन हिंदुसंकृती निर्माण झाली.सत्य न्याय निती अहिंसा,स्वातंत्र्य हे मूल्य घेऊन बौध्द धम्म म्हणजे एक मार्ग निर्माण झाला.या तत्वाची एक व्यवस्था निर्माण झाली.अहिंसा साठी जैन धर्म आणि अन्याय अत्याचार थांबविणे साठी ,स्वसंरक्षण कसे करून घ्यावे? स्वावलंबी कसे बनावे ? हे शिकवण्या साठी शीख धर्म स्थापन झाला.समता शिकवणारा ” लिंगायत धर्म ” बसवेश्र्वरांनी स्थापन केला,महात्मा फुलेंा नी ” सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला.असे अनेक धर्म उदयास आले.त्या सर्वांचे धेय्य हे अत्यंत उच्च मोठे, उद्दात,पवित्र,शुध्द,विकसित ,सेवाभावी,अखिल मानव जातीसाठी कल्याणकारी न्याय देणारे होते.या सर्व धर्माच्या मुळाशी संवेदना,दया,क्षमा,शांती,सत्य,न्याय,निती याच प्रेरणा होत्या,नव्हे आहेत.
पण त्या सर्वांची वर्तमान स्थिती अगदी विपरीत आणि त्या त्या धर्माच्या विरूध्द आहे,कोणत्याही धर्माच्या माणसाला ना निती,ना सत्य,ना दया मया,ना क्षमा,शांती,ना परोपकार,ना शेजार धर्म,ना त्याग,ना शांती अमन.सारे काही बिघडलेले आहे,साऱ्या धर्मात हिंसा बोकाळली आहे.तिने थैमान घातले आहे, नंगा नाच,नंग्या तलवारी, भाले बरच्या,आम् रस्त्यावर गर्दीत मिरवता ना दिसताहेत,शांतता सुरक्षितता भंगलेली आहे.सामान्य निष्पाप सज्जन माणूस जीव मुठीत धरून जीवन कंठीत आहे.अत्यंत भीतीच्या अविश्वासाच्या वातावरणात.
धर्माची ही अवस्था अशी का झाली ? याचे कारण माणसानेच शांतीमय,सुरक्षित,संपन्न जीवन जगण्यासाठी धर्माची संकल्पना शोधून काढली.पण ती गल्लत साबित झाली.ही संकल्पना स्वार्थ,मोह,शोषण,पिळवणूक,विषमता यास पूरक आणि पोषक ठरली.आणि समतेची दुश्मन बनली. विषमतेची स्वार्थाची अन्याय अत्याचाराची व्यवस्था निर्माण करणारा वैदिक ब्राम्हणी धर्म निर्माण झाला.त्याने स्वर्ग,मोक्ष ,देव याची लालुच आणि भीती पण दाखविली.त्यात तो धर्म सरस ठरला.आणि ऐतखाऊ आणि श्रमिक,शोषित शोषक,सज्जन दुर्जन अशी व्यवस्था स्थापन करण्यात तो धर्म यशस्वी झाला.बहुजन श्रमिक त्यास बळी पडले.अजूनही पडतच आहेत.बहुजनांना स्वातंत्र्य समता बंधुभव न्याय ही मानवी मूल्य नाकारणारा विषमतावादी विचाराचा धर्म आज सत्तेत आहे.हे जेंव्हा बहुजनास कळेल,तेंव्हाच महागाई,भ्रष्टाचार,काळाबाजार,साठेबाजी,जुगार,व्यसने ,शोषण,स्त्री शोषण थांबेल,देऊळ बंदी,शिक्षण बंदी,अस्पृश्यता,रोटी बेटी बंदी,धन पैसा कमावण्याची बंदी येणार आहे,येऊ घातलेली आहे.हुकूमशाही,गुलामी,माणसांची खरेदी विक्री चालू होईल,त्या दृष्टीने पाऊले पडण्यास सुरुवात झाली आहे,श्रीमंतांना श्रीमंत करणे,खाजगीकरण करून बेकारी वाढविणे,सत्तेला हुकुमशाही त रूपांतरित करणे सुरू झाले आहे.जरा नीट लक्ष देऊन चिंतन करा,म्हणजे तुम्हाला हा बदल होत असलेला दिसेल.
याचा अर्थ धर्माची वाटचाल ही गुलामिकडून स्वातंत्र्य समता न्याय आणि परत माघारी पारतंत्र,विषमता,अन्याय म्हणजेच गुलामगिरीकडे असा हा धर्माचा प्रवास आहे.
लेखक: दत्ता तुमवाड…
सत्यशोधक समाज नांदेड…
दिनांक:२८ मार्च 2025…
फोन: 9420912209.