
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- जिल्ह्यातील वडसा व कुरखेडा तालुक्यात तसेच तालुक्यातील गाव खेड्यात आयपीएल सट्टा अवैध धंधा मोठ्या प्रमाणात व सरसकट सुरू असून संबंधित विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे बोलल्या जात आहे.
आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हा तसा गरिबीने ग्रासला आहे पण अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गरीब पुन्हा गरीब होत चालले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.
मुख्य म्हणजे सट्टा पट्टी किंग हाच आयपीएल चा माईंड मास्टर असल्याचे बोलल्या जात आहे. आयपीएल हा सट्टा खेळून लुटमार करणारा अवैद्य व्यवसाय आहे. यात टॉस पासून तर मॅच संपेपर्यंत सट्टा लावल्या जातो. हा आयपीएल चां सट्टा लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत पोहचला आहे. याचे गंभीर परिणाम होत असल्याची जनमानसात चर्चा आहे. मोठ्याप्रमाणात चालक मालक गब्बर असतो त्यामुळे लावणारे कंगाल होतात आणि घेणारे मालामाल होतात.
संपूर्ण वडसा तालुक्यात व कुरखेडा तालुक्यात आयपीएल सट्टा चा माहेर घर आहे असे ही म्हटले जाते. कुरखेडा येथील एक व्यवसायिक नावापुरतीच दुकान लावून सर्व दोन्ही तालुक्यावर नियंत्रण ठेवत असल्याचे बोलले जाते.
सबंधित दोन्ही तालुक्यातील अवैध आयपीएल सट्टा व्यवसाय चालविणाऱ्या दोन्ही तालुक्याचे नियंत्रक DYSP यावर गांभीर्याने लक्ष देऊन अशा अवैध व्यवसायाला आळा घालतील का?याकडे लक्ष लागून आहे.