चारगांव येथील समाधान शिबिरात राज्यमंत्री अँड जैस्वाल यांनी कृषि विभागांतर्गत अनुदानित ड्रोन,ट्रॅक्टर व रिपरचे पुर्वसमती पत्र केले वितरित…  — कृषी विभागातंर्गत योजणांचा ७२ शेतकरी यांनी घेतला लाभ,तालुका कृषी अधिकारी राकेश वशु यांची माहिती…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:दिनांक 27.03.2025 रोजी नागपूर जिल्हातंर्गत पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मौजा चारगाव,येथे शासनाचे 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत समाधान शिबिराचे ना.ऍड.आशिष जयस्वाल राज्यमंत्री कृषी,वित्त, नियोजन,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय कामगार महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

             यावेळी प्रियेश महाजन उपविभागीय अधिकारी रामटेक,सुरेश वाघचौरे तहसीलदार,सुभाष जाधव गट विकास अधिकारी,राकेश वसु तालुका कृषी अधिकारी पारशिवनी व तालुकास्तरीय इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत सदर शिबिराच्या ठिकाणी लाभार्थीना कृषी संबंधित सेवा देण्यात आल्या. 

       सदर शिबिरामध्ये चारगाव व नवेगाव खैरी मंडळ परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       यावेळी कृषी राज्यमंत्री यांनी कृषि विभागांतर्गत अनुदानित ड्रोन, ट्रॅक्टर व रिपरची पाहणी केली व पुर्वसमती पत्र वितरित केले.

             यावेळी वरिष्ठ मंडळ कृषी अधिकारी सुरज शेंडे,कृषी पर्यवेक्षक जगदीश भालेराव,कृषी सहाय्यक रवींद्र सोरमारे,आकाश पांगरकर,प्रशांत बोरसे,तालुका आत्मा चे तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद सोमकुवर उपस्थित होते.