अभिजात मराठी विशेषांकाचे प्रकाशन… — समर्थ महाविद्यालय लाखनी… 

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

        स्थानिक समर्थ महाविद्यालय लाखनी येथे 35 व्या मराठी प्राध्यापक परिषद अधिवेशनाच्या अनुषंगाने संशोधन लेख मागविण्यात आलेले होते.

       अभिजात मराठी याविषयीचे शोधनिबंध असलेला ग्रंथ आज 27 फेब्रुवारी रोज गुरुवारला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, प्रमुख वक्ते डॉ.अलकाताई सरोदे, डॉ.बंडू चौधरी, विदर्भ साहित्य संघ अध्यक्ष ह रा मोहतुरे, सचिव डॉ. मुक्ताताई आगाशे, डॉ.नीलिमा कापसे, प्रा.अजिंक्य भांडारकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

          दिनांक 17,18 जानेवारी 2025 ला मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथील कुलगुरू डॉ.अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते अभिजात मराठी विशेषांक मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले होते.

        या ग्रंथाच्या संपादनासाठी डॉ. प्रशांत सूर्यवंशी, डॉ.कोमल ठाकरे, डॉ.विजय रेवतकर, डॉ.राज मुसणे, डॉ. बंडू चौधरी, डॉ नीलिमा कापसे, प्रा.अजिंक्य भांडारकर यांनी परिश्रम घेतले. या प्रकाशनसाठी मराठी प्राध्यापक परिषद अध्यक्ष डॉ.गणेश मोहोड, डॉ.राजेंद्र वाटाणे, प्राचार्य हिराजी बनपुरकर, डॉ.अजय चिकाटे, डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांनी मार्गदर्शन केले.

         अत्यंत अभ्यासपूर्ण असा अभिजात मराठी विशेषण असून संशोधन विद्यार्थी प्राध्यापक यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथ आहे असे यावेळी आपल्या संपादकीय मनोगत आतून डॉ.नीलिमा कापसे यांनी मत मांडले.

        या कार्यक्रमाचे संचालन प्रा रूपाली खेडीकर, प्रास्ताविक डॉ.बंडू चौधरी तर आभार प्रा.अजिंक्य भांडारकर यांनी मांडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापकांची उपस्थिती लाभलेली होती.

          यात डॉ.धनंजय गिरीपुंजी, डॉ.धनंजय गभने, डॉ. सुरेश बनसपाल, डॉ.संगीता हाडगे, डॉ.सुनंदा देशपांडे, डॉ. संदीप सरया, मंगेश शिवरकर, दिनेश सलामे, बाळकृष्ण रामटेके, लालचंद मेश्राम, डॉ.स्मिता गजभिये, शामराव पंचवटे, मिलिंद कांबळे, स्वाती नवले, राखी बावनकुळे मोठ्या संख्येने वाचकांची उपस्थिती होती.