एन. जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश सचिव पदी अबोदनगो चव्हान यांची नियुक्ती….

   डॉ.मंगेश रनदिवे

विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र..

        एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पांडूरंग नरवडे यांनी नुकतेच विदर्भ प्रदेश कार्यकारिणीला मान्यता दिली असून विदर्भ प्रदेश सचिव पदी दखल न्यूज भारत चे चिखलदरा तालुका प्रतीनिधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

        अमरावती जिल्हा अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ सारख्या दुर्गम भागातील रहिवासी असलेले अबोदनगो चव्हान हे समाजसेवेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य करतात. तद्वतच ते पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत असतात. पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्व तद्वतच अभूतपूर्व लिखाणाच्या जोरावर आपला प्रभाव कायम ठेवत जनमानसात आपली आगळीवेगळी छबी निर्माण केली आहे.

       अबोदनगो चव्हाण सर यांचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत,अगदीच विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशीही अगदी जिवलगपणे मैत्रीचा हात पुढे करुन ऋणानुबंधाचे एकनिष्ठ नाते जोपासणारे,आपल्या सहकारी मीत्रा विषयी चव्हाण सर यांच्या वैचारिक मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले चव्हाण सर! काही माणसं स्वभावाने कशीही का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,अशा माणसांपैकीच एक म्हणजेच अबोदनगो चव्हाण सर…..!

         आपल्या निस्वार्थ कर्तव्यदक्ष जबाबदारीवर ठाम राहुन अनेक शिखरे पादाक्रांत करणारे, पत्रकारितेतील दांडगा अनुभव 1998 पासुन अनुभव जोपासत निर्भीड कार्यप्रणालीतुन आपली छाप पाडणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व तद्वतच शांतीप्रिय कृतीशील मनोधर्याचे धनी आणि एक पत्रकार ते महत्त्वपूर्ण संघटनेचे विदर्भ सचिव असा पत्रकारितेतील व सामाजिक आयुष्यातील खडतर प्रवास पार करुन आपली प्रगत ओळख निर्माण करणारे दखल न्यूज भारत चे चिखलदरा तालुका प्रतीनीधी अबोदनगो चव्हान हे सदैव संवेदनशील व्यक्तिमत्त्व असून बोलते वैचारिक पिठ आहेत.

          त्याचा स्वभाव शांत असून असून ते समजदार आहेत. तद्वतच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याची एन जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ते सार्थकी ठरवतील असे म्हणण्यास हरकत नाही..