धानोरा/भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालय काल दिनांक 27. 2. 2023 रोज सोमवारला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक बी. डब्ल्यू.सावसाकडे, विशेष अतिथी म्हणून गोपाल राऊत मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव तसेच प्रमुख अतिथी डी .आर. भोयर,एस.व्ही. नागदेवते, कुमारी भारती श्रीरामे मँडम, आदि मान्यवर उपस्थित होते.
बोर्डाची इय्यता दहावीची परीक्षा येत्या दोन मार्चपासून सुरू होत असल्याने गणेश अलंकार विद्यालय निमगाव येथे शिक्षण घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन बोर्ड परिक्षे बाबत मार्गदर्शन करन्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हि. पी. नागतोडे संचालक कुमारी नृप्रिया सुरपाम हीने तर आभार प्रदर्शन वर्ग ९वि तिल विद्यार्थी रितिक शिडाम यांने केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वर्ग नवविच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले