नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे 28 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय भौतिकवादी चंद्रशेखर वेंकटरमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला त्यानिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. एन.पी.बावनकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. बी.पी.बोरकर प्राध्यापिका एस.एन.गहाणे ,के.एम. कापगते, डी.आर.देशमुख, आर.सी.बडोले, एम.टी.कोचे व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते सी. व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून करण्यात आले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या वतीने विद्यालयात अपूर्व मेळावा हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजविणारा तसेच त्यांना हसत-खेळत शिकविणारा मेळावा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच बघावे , समजून घ्यावे, शिकावे व स्वतः करून पहावे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व प्रत्येक घटकातील कार्यकारण भाव समजावा या उद्देशाने अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने व मोठ्या उत्साहाने वर्ग 5 ते 9 व 11 च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये अविरतपणे विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्याचे दृढीकरण व्हावे या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापिका एस एन गहाणे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले सी व्ही रमण यांनी रमण इफेक्ट चा शोध लावला व या शोधातूनच पुढे “स्कॅटरिंग ऑफ लाईट” चा शोध लावला आणि या शोधासाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने करण्यात आले. आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला. आपल्या समाजातील ज्या अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत, असे मौलिक विचार गहाणे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून ठेवले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुद्धा विज्ञानावर आधारित भाषणे व गीत सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन डी. एस. बोरकर सर यांनी तर आभार प्रदर्शन डि. डि. तुमसरे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.