दखल न्युज भारत
मेळघाट प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण
चिखलदरा :- चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रूसोंडा केंद्रांतर्गत येणाऱ्या अंबापाटी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यात टेम्ब्रूसोंडा केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांनी आपला सहभाग नोंदविला.
शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धांडेकर व गोकुल सुरजेकर हे होते तर प्रमुख अतिथी अरुण शेगोकार गटशिक्षणाधिकारी पं.स. चिखलदरा हे होते.
शिक्षण परिषदे मध्ये अरुण शेगोकार गटशिक्षणाधिकारी पं स चिखलदरा यांनी सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले. टेंब्रुसोंडा केंद्राच्या केंद्रप्रमुख वंदना पांडे यांनी शैक्षणिक तथा प्रशासकीय बाबीवर मार्गदर्शन केले.केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक घोम सर,लुटे सर विषय तज्ञ यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकसन यावर शिक्षकांसोबत चर्चा केली.
शिक्षण परिषदेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी उपस्थिती दर्शविली.
केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. शिक्षण परिषदेची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांकडून इंग्रजीमध्ये घेण्यात आलेल्या परिपाठाने झाली.
शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया देशमुख,सहाय्यक शिक्षक जीवन गवई,यशवंत पात्रे, संगिता कडू, सुनंदा कुकडे,शिल्पा लामखाडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन संगीता कडू यांनी केले तर जीवन गवई यांनी उपस्थितांचे आभार मानले.