रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर तालुक्यात अतिक्रमण हटाव मोहीम तगडा बंदोबस्तामध्ये सुरु आहे.चिमूर व नेरी येथे अतिक्रमण मोहीम राबविली.
मात्र,मौजा नवतळा येथील ग्रामपंचायत चाळ लगत अतिक्रमण करून पक्के बांधकाम करीत आहेत.या अतिक्रमण संबंधाने समाजसेवक रविंद्र मासुरकर यांनी तक्रार करून सुद्धा ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीतून केला आहे.
नवतळा येथील मुख्य मार्गा लगत ग्रामपंचायतची चाळ आहे.चाळ असलेल्या दुकाना लगत खाली ग्रामपंचायतच्या जागेवर भास्कर रामटेके यांनी पक्के बांधकाम करण्यास सुरवात केली आहे.
शासकीय जागेवर अतिक्रमण करून ग्रामपंचायतच्या विना परवानगीने बांधकाम कसे काय करीत आहे?असा प्रश्न रविंद्र मासूरकर यांचा आहे.
गावाकऱ्याच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मासुरकर यांनी सरपंच व सचिव यांना दिनांक २४ जानेवारीला लेखी तक्रार करून सुद्धा सदर बांधकाम करण्यासाठी स्थगिती दिली नाही.या संदर्भात ग्रामसेवक यांनी लक्ष कां दिले नाही? हे एक कोडेच आहे.
एकीकडे गेली अनेक वर्षा पासूनचे पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण चिमूर व नेरी येथील प्रशासन पोलीस बंदोबस्तामध्ये काढून टाकत असताना,नवतळा ग्रामपंचायत सरपंच,सचिव याकडे कानाडोळा का म्हणून करीत आहेत?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मासुरकर यांनी केला आहे.
नवतळा ग्रामपंचायत दुकान चाळ लगत ग्रामपंचायतच्या गावठाण जागेवर सुरु असलेले बांधकाम हटविन्याची मागणी न्यायोचित नाही काय?याचा सारासार विचार ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.