घुग्घूस शहरात स्मार्ट मिटर लावण्यात येऊ नये!.. — काँग्रेसची मुख्य अभियंताला निवेदनातून मागणी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

घुग्घूस : शहरातील वीज मीटर मागणाऱ्या लोकांना महावितरण तर्फे स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याची तक्रार शहर काँग्रेस कार्यलयात प्राप्त झाल्याने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने महावितरण कार्यलय घुग्घूस येथील मुख्य अभियंता भटारकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी महाराष्ट्रात स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही.

       असे जाहीर केले मात्र चंद्रपूर जिल्ह्यात महावितरण तर्फे सर्वात आधी शासकीय कार्यलयामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात आले यानंतर ज्या नागरिकांचे मीटर खराब झाले त्यांना स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे.

         आज जरी स्मार्ट मीटर मध्ये रिचार्जे लागू केला नसला तरी हळू – हळू नागरिकांच्या घरी स्मार्ट मीटर लावून त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचा षडयंत्र रचल्या जात आहेत.

            चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून यामध्ये ठेकेदारी कामगारांचा शेत मजूर व छोटे व्यापाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे व कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही.

            त्यामुळे स्मार्ट रिचार्जे मीटर हे नागरिकांना परवडणारे नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यात व घुग्घूस शहरात स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

          काँग्रेस शिष्ठमंडळात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सदलावार,जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, विशाल मादर ता. सचिव महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, मंगला बुरांडे, शेखर तंगडपल्ली, शहजाद शेख इंटक उपाध्यक्ष, देविदास पुनघंटी, श्रीनिवास गुडला तालुका उपाध्यक्ष, दिपक पेंदोर, कुमार रुद्रारप, सुनील पाटील, रोहीत डाकूर,दिपक कांबळे,सतीश आटे,सूरज ठावरी, अभिषेक सपडी,शहंशाह शेख,अंकुश सपाटे,आयुश आवळे, साहिल आवळे,मिना श्रीवास्तव, अनिता जुनघरे, निशा शेख, वर्षा पाटील, चंदा दुर्गे,पपीता वासेकर, नंदा आत्राम,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.