दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर :- आपण हे वर्ष संविधानाचे अमृत वर्ष म्हणुन साजरे करत आहोत, या अमृतवर्षात चंद्रपूर मनपातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, सोयी- सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार असुन,सर्वांनी आपल्या राष्ट्राला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपूर मनपा मुख्यालयात आयोजीत ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे,मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी,शहर अभियंता विजय बोरीकर, नगरसचिव नरेंद्र बोभाटे,उपअभियंता रवींद्र हजारे,विधी अधिकारी अनिलकुमार घुले,रवींद्र कळंबे,राहुल पंचबुद्धे,सचिन माकोडे,अनिल बाकरवाले,डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अमोल शेळके ,अमूल भुते आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व अग्निशमन विभागातर्फे घेण्यात आलेल्या फायर बुलेट या दुचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.आग लागलेली असतांना ज्या जागी मोठी वाहने जाऊ शकत नाही तिथे ही दुचाकी वाहने जाऊ शकणार आहे. आग विझविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य या वाहनांत उपलब्ध असुन शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून व अरुंद रस्त्यावरील भागात या वाहनांचा उपयोग होऊ शकणार आहे.
आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विशेष कामगिरी करणाऱ्या मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.