ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली “तंबाखू मुक्त शाळा अभियान” अंतर्गत तंबाखू मुक्ती साठी शाळा व विद्यार्थीच नव्हे तर समाजातील व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी भंडारा येथे पोलीस मैदानावर अतिथींच्या हस्ते जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ साकोली येथील पदवीधर शिक्षक चेतन बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच साकोली शालेय स्तरावर सुद्धा त्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तथा सलाम मुंबई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने साकोली जि. प. उच्च. प्राथ. शाळा साकोली १ येथील शिक्षक चेतन बोरकर यांना २६ जानेवारी गणराज्य दिनानिमित्त भंडारा जिल्हा पालकमंत्री व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षणाधिकारी ( प्राथ.) रविंद्र सोनटक्के, ( प्राथ.), शिक्षण अधिकारी ( माध्य.) सलामे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिकारी डॉ.कुकडे, समला मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी संजय ठेणगी तसेच गटशिक्षणाधिकारी विजय आदमने उपस्थित होते.
साकोली जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र १ येथेही ( सोम. २७ ला ) पदवीधर शिक्षक चेतन बोरकर यांचा शाळा प्रशासन, शाळा व्यवस्थापन व पालक वतीने आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, सेंदूरवाफा मुख्याध्यापक ए. बी. मेश्राम, मुबारक सय्यद, पं. स. शिक्षण वि.अ. भलावी, सहा. शिक्षक एम. व्ही. बोकडे, टी. आय. पटले, शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औटी, आरती कापगते, भुमेश्वरी गुप्ता, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत भारद्वाज, उपाध्यक्ष हिमा राऊत, सदस्यगण शिशुपाल क-हाडे, आशिष चेडगे, भागवत लांजेवार, वैशाली कापगते, पुनम मेश्राम, दिलीप झोडे, रिना शहारे, पोषण आहाराचे रेषमा कोवे, छन्नू मडावी, कविता बावणे यांसह इयत्ता १ ते ७ मधील सर्व विद्यार्थ्यांनी चेतन बोरकर यांचे अभिनंदन केले आहे.