दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
नागपूर येथील सोनझरी येथे संत हजरत ताजउद्दिन बाबांचा वाढदिवस विविध कार्यक्रमासह थाटात संपन्न झाला.
सोनझरी येथील आदिवासी बांधवांनी आणि भगिनींनी घोडे व बँड पथकांच्या तालात आणि रोशनीच्या झक्क प्रकाशात संत हजरत ताजउद्दिन बाबांचा केक कापून वाढदिवस साजरा केला.
संत हजरत ताजउद्दिन बाबांचा वाढदिवस,मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा मागील १६४ वर्षांपासून नागपूरात सातत्याने सुरू आहे.