भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांचे (चिमुर क्रांती भुमीत) रामदेगी येथे होणार आगमन… — धम्म सोहळा समारंभाचे मुख्य अतिथी असणार…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

        भिम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक भाई खासदार चंद्रशेखर आजाद यांचे भव्य धम्म संभारंभ निमित्ताने संघरामगीरी येथे दिनांक ३० जानेवारीला‌ आगमन होणार आहे.

       यामुळे भिम सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.भारत देशात भाई चंद्रशेखर आजाद संसंदेत बहुजनांच्या मुद्द्यावर आणि संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवून लढा देत आहेत.

      त्यामुळे बहुजन समाज हा भाई चंद्रशेखर आजाद यांना मोठ्या प्रमाणात पंसती देत असल्याचे दिसुन येत आहे.अश्यात भदंत डॉ.धम्मचेती यांनी संघरामगीरी मध्ये भाई चंद्रशेखर आजाद यांना प्रमुख अतिथी म्हणून धम्म समारंभा निमित्ताने निमंत्रित केले आहे.

           भाई चंद्रशेखर आजाद हे चिमुर क्रांती भुमीत येणार असल्याची माहिती भिम आर्मी भारत एकता मिशन चिमुर तालुका माजी महासचिव तथा भिम आर्मी तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम यांनी दिली आहे.

          खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.