
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
दि.27 जाने महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने एक अवैध रेती भरलेला ट्रक तसेच दि. 26 जाने ला रात्री अकरा वाजता दरम्यान खडसंगी परिसरात अवैध मुरमाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून जप्त करून तहसील कार्यालयात येथे जमा केले.
27 जानेवारी ला रेती भरलेला ट्रक क्रमांक एम एच 40 एन 6221 चिमूर ला येत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाच्या तलाठी पथकाला मिळाली असता सातनाल्याजवळ सापळा रचून ट्रकला पकडण्यात आले.
तो ट्रक गौतम पाटील यांच्या मालकीचे असल्याची समजते सदर ट्रकला तहसील कार्यालयात जमा करून जप्तीची कारवाई करण्यात आली.
तसेच 26 जाने ला रात्रीला अकरा वाजता दरम्यान खडसंगी परिसरातील नवेगाव मार्गावर दोन मुरमाचे ट्रकटर क्र एम एच 33 ए सी 1635 तर दुसरा बिना नंबरचा पकडण्यात महसूल विभागाला यश आले.
सदर ट्रॅक्टर हे अवैध मुरमाची वाहतूक करीत असल्याचे दिसून आले असता त्यांच्यावर सुद्धा जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टर अमित बानकर, तोमेश नाटके यांच्या मालकीचे असल्याचे माहिती मिळाली आहे.
सदर कारवाई चिमूरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागातील संयुक्त पथकाचे प्रसाद गोडघासे, उमेश पाटील, प्रितेश ठाकरे, प्रितम चिडे शुभम बलकी, स्वप्नील उमरे यांनी केली आहे.