सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधी वर्धा..
वर्धा:- दी. 26 जानेवरी प्रजासत्ताक दिनाचा शुभ प्रसंगी गृह रक्षक दलाचे रविन्द्र प्रभाकर चरडे व अमित शंकर तिमांडे यांच्या सत्कार करण्यात आला.
गृह रक्षक दलाचे पलटन नायक रविन्द्र चरडे व गृह रक्षक सार्जेट अमित शंकर तिमांडे यांना भारत सरकारच्या वतीने गृह रक्षक दलामार्फत राबविलेल्या आपातकालीन व्यवस्थापन व विशेष सेवा करण्याकरिता 2024 चे “राष्ट्रपति पदक”जाहिर करण्यात आलेले आहे.
या करिता श्री.राहुल कार्डिले जिल्हाअधिकारी वर्धा,श्री.नुरुल हसन पोलीस अधीक्षक वर्धा,श्री.डॉ.सागर कवड़े जिल्हा समादेशक होमगार्ड वर्धा तथा अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या तर्फे 26 जानेवरी रोजी प्रजासत्ताक दीनी स्टेडियम वर्धा येथे राष्ट्रपती गुनवत्तापूर्ण मेडल जाहिर झाल्या बद्दल रविन्द्र प्रभाकर चरडे व अमित शंकर तिमांडे यांचा सत्कार करण्यात आला.