बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
बावडा येथील शिवाजी विद्यालय व कानिष्ठ महाविद्यालयामध्ये नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा उत्साही वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी राजवर्धन पाटील यांनी संचालनाची पाहणी केली व मानवंदना स्वीकारली. तसेच या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा राजवर्धन पाटील व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डी. आर. घोगरे यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, मेजर बबनराव सूर्यवंशी, प्रतीक्षा कवडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निरा-भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, खजिनदार उमेश सूर्यवंशी, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे, सुधीर पाटील, प्रसाद पाटील, संतोष सूर्यवंशी, स्वप्निल घोगरे, विठ्ठल घोगरे, उपप्राचार्य जी. जे. जगताप, पर्यवेक्षक डी. व्ही. हासे व बनकर, रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. वावरे, शहाजीराव पाटील कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य व्ही. के. मोहिते, शहाजीराव पाटील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक घोगरे, श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक गुरव, काळेश्वर वस्तीगृहाचे अधीक्षक नीतीन जाधव, माजी सैनिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ, अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. टी. मुलाणी यांनी केले.