
चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी:- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई आणि महानुभाव साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठान दहिपुरी ता. अंबड जि. जालना व मराठी विभाग समर्थ महाविद्यालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हास्तरीय “आद्य कवयित्री महदंबा काव्यवाचन स्पर्धेचे” आयोजन दिनांक ३१ जानेवारी २०२४ ला सकाळी ११.३० वाजता समर्थ महाविद्यालय लाखनी येथे आयोजित करण्यात आली आहे.
या काव्यवाचन स्पर्धेसाठी भंडारा जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. विद्यार्थ्याच्या वक्तृत्व व प्रतिभेला एक चांगले व्यासपीठ या स्पर्धेतून मिळेल अशी अपेक्षा आहे. तरी आपणास विनंती आहे की, वरील स्पर्धेत आपला सहभाग जरूर नोंदवा. समन्वयक डॉ. बंडू चौधरी, मराठी विभागप्रमुख, समर्थ महाविद्यालय लाखनी ९७६५१९२८७८, प्रा. अजिंक्य भांडारकर मराठी विभाग, समर्थ महाविद्यालय लाखनी ९४२०३६६००६ यांच्या कडे नाव नोंदवावे. स्पर्धेसाठी कुठलेही प्रकारचे शुल्क आकारले गेलेले नाही. स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम, द्वितीय, तृतीय येणा-या विद्यार्थ्यास २० फेब्रुवारी २०२४ रोजी होणा-या तिसरे आद्य कवित्री महदंबा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात येईल. विद्यार्थी कोणत्याही कवीची किंवा स्वरचित कविता सादर करू शकतात. मराठी भाषा साहित्य संस्कृती यांच्या महत्वपूर्ण योगदानाबाद्ल प्रत्येक महाविद्यालयातील स्पर्धा समन्वयक / प्राचार्य यांचा गौरवही संमेलनात करण्यात येईल. तरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन महदंबा साहित्य संमेलनाचे संयोजक भारत भूषण शास्त्री व डॉ कोमल ठाकरे, डॉ बंडू चौधरी, प्रा अजिंक्य भांडारकर यांनी केले आहे.