दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
प्रतिनिधी
गडचिरोलीच्या गोकुलनगर येथील ३५ वर्षीय एकनिष्ठ कार्यकर्ता बाळू मडावी यांचे अकस्मात निधन झाल्याने संपुर्ण कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले.ही बाब राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार हे एक महिण्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता निदर्शनास येताच वडेट्टीवार यांनी तत्काळ कुटुंबीयांच्या मदतीला धावून आलेल्या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत केली.
गडचिरोलीच्या गोकुलनगर येथील बालु मडावी याचे वयाच्या ३५ व्या वर्षी अकस्मात निधन झाले.कुटुंबातील कमावता अचानक काळाच्या ओघात पडद्याआड झाल्याने कुटूंबावर दु:खाचे डोंगर कोसळले. अलिकडे स्वार्थी राजकारणाला उत आले असल्याने नागरिकांच्या मुलभुत गरजांकडे पुर्णता दुल॔क्ष करून राजकीय पोळी शेकून घेण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जात आहेत.माञ अशात एखादा कर्तुत्ववान व्यक्ती अचानक दगावल्यास त्याच्या कुटुंबाचे काय?असा गंभीर प्रश्न आपसुक उपस्थित होऊ लागला आहे.
अशात २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरीबांच्या मदतीला धावून जाण्यात आमदार वडेट्टीवार नेहमीच अग्रेसर ठरले आहेत.दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता अचानक काळाच्या पडद्याआड झाल्याने कुटूंब निराधार झाल्याचे लक्षात येताच कुटुंब उघड्यावर पडु नये याची काळजी घेत वडेट्टीवारांनी तत्काळ कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन तत्काळ आर्थिक मदत केली.आमदार वडेट्टीवार यांच्या उदारतेबद्दल कुटुंबियांनी वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे. त्यावेळी अतुल मल्लेलवार, कुणाल पेंदोरकर, अनिल कोठारे, राकेश रत्नावार, प्रफुल आंबोरकर, आरिफ कनोजे उपस्थित होते.