युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
दर्यापूर तालुक्यातील थिलोरी हे गाव नझुल सीट पिआर कार्ड मध्ये समाविष्ट आहे. सदर गावात मालमत्ता सीट क्रमांक तीन नगर भूमापन क्रमांक 205 क्षेत्रफळ 84 चौरस मीटर 903.84 चौरस फूट शासकीय खुली जागा आहे या जागेवर फार वर्षांपूर्वी सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत ती जागा महत्त्वाच्या सणांच्या दिवशी गावातील नागरिकांना सामूहिक कार्यक्रम करण्यासाठी खुली जागा वापरण्यात येत होती. मात्र या शासकीय जागेवर प्रमोद मोतीरामसा सुरपाटणे त्यांचे कुठलेही हक्क किंवा अधिकार नसताना त्या जागेवर नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप तक्रार करते सतीश विजय होले व ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. सदर बांधकाम हे अवैद्य व बेकायदेशीर असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय थिलोरी यांना 13 जानेवारी रोजी लेखी तक्रार देण्यात आली होती मात्र आज रोजी सुद्धा ग्रामपंचायत ने सदर अतिक्रमणधारक याच्यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अतिक्रमण धारकाने बांधकाम सुरूच ठेवले आहे . ग्रामपंचायत सचिव चारथळ यांना सदर तक्रार करता यांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायत सचिव सुद्धा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे आरोप पत्रकार परिषद मध्ये केलेला आहे .त्यामुळे येत्या चार दिवसात अतिक्रमण जागेवरील बांधकाम ग्रामपंचायतने न पडल्यास तक्रार करतासह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.या पत्रकार परिषदेला सतिश होले, माजी सरपंच अनील होले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदिप धर्मांळे,मनिष होले,रवींद्र होले,विलास भोवावू,राहुल होले,गजानन होले,सुरेश होले,विवेक होले,निलेश होले,संतोष होले,जनार्धंन होले,पुरुषोत्तम होले उपस्थिती होते.