दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संचालकपदी भानुदास पऱ्हाड यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. शिरूर प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वातील बक्षीस वितरण सोहळ्यात असोसिएशनचे अध्यक्ष मल्हारी गव्हाणे व उपाध्यक्ष यशवंत पाचंगे यांच्या हस्ते भानुदास पऱ्हाड यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष राहुल पवार, सचिव लक्ष्मण गव्हाणे, सदस्य सागर दरेकर, प्रवीण गव्हाणे, सागर गायकवाड आदिंसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मंदार पाचुंदकर, योगेश फराटे यांचीही नियुक्ती झाल्याचे घोषित करण्यात आले.