कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान – कन्हान शहर युवक कांग्रेस आणि सर्व धर्म समभाव संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ वा प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेविका सौ.रेखा टोहणे , नागपुर जिल्हा युवक कांग्रेस सचिव रोहित बर्वे , सचिव अजय कापसीकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी , शहिद भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात केली . त्यानंतर शालेय विद्यार्थांना बिस्कीट वाटप करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी आनंद चकोले , चंदन मेश्राम , प्रशांत मसार , दीपक तिवाड़े , सोहेल सय्यद , चेतन नांदुरकर , अखिल शेंडे , प्रमोद मेश्राम , किंजल मेश्राम , हरीभाऊ वानखेडे , अविनाश हातागडे , अक्षय फुले , दिलीप बावने , रामेश्वर ठाकुर , किशोर यादव सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .