प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
जिल्हयाच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघटक यांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेच्या वतिने सर्वोत्कृष्ट जिल्हयातील गुणंवत खेळाडू (महिला, पुरुष व दिव्यांग)- ०३ व गुणंवत क्रीडा मार्गदर्शक ०१ असे जास्तीत जास्त ०५ पुरस्कार दिले जातात.
त्या अनुषंगाने सन २०२४-२५ करिता चंद्रपूर जिल्हयातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघटक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दि. १५ जानेवारी २०२४ रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे मोरेश्वर गायकवाड क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांचेकडे उपलब्ध आहे. सदर अर्ज दि. १५ जानेवारी २०२४ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशीरा येणारे अर्ज स्विकारले जाणार नाही.
अर्ज सादर करित असतांना अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत १० वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांनी वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
क्रीडा संघटक म्हणून सतत १० वर्ष महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले असले पाहीजे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगत पुर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत खेळामध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. तसेच अर्ज करीत असतांना शासननिर्णय दि. १४ डिसेंबर २०२२ च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटि व शर्ती ची पुर्तता करणे आवश्यक आहे.
वरिल सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु. १०,०००/- या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेल्या युवकांना दि. २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थिती प्रदान करण्यात येणार आहे. असे अविनाश पूंड जिल्हा कीडा अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.